मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची बदली, मिळाली 'ही' जबाबदारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai Municipal Commissioner Iqbal Chahal transferred to Center

मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची बदली, मिळाली 'ही' जबाबदारी

मुंबई : मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची केंद्रात बदली झाल्याची माहिती समोर आली आहे. चहल यांना बढती मिळाली आहे. आता त्यांची नियुक्ती केंद्रात सचिव पदावर करण्यात आली आहे. मुंबईतील कोरोना रूग्णवाढीच्या काळात त्यांनी मुंबई आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शहरात अनेक कठोर उपाय योजना राबवल्या होत्या. (Iqbal Singh Chahal Transfer)

याबाबत माहिती देताना इक्बाल सिंह चहल म्हणाले आहेत की, मला हे सांगताना आनंद होत आहे की, भारत सरकारने मला केंद्रात सचिव पदाचा दर्जा दिला आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या कारकिर्दीतील या पदावर नियुक्ती ही सर्वाधिक अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितेले.

हेही वाचा: शाहू छत्रपतींच्या विधानावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया; म्हणाले, मी सत्यच बोललो पण....

इक्बाल चहल हे 1989 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. चहल हे यापूर्वी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव होते. तसेच जलसंपदा विभागातही त्यांनी प्रधान सचिव म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिवपदीही तसेच औरंगाबाद, ठाणे येथे जिल्हाधिकारी म्हणून देखील त्यांनी काम केले आहे.

हेही वाचा: सुजय विखे धनुष्यबाण हाती घेतील, नार्वेकरांची 'क्रिकेटनामा'मध्ये फटकेबाजी

Web Title: Mumbai Municipal Commissioner Iqbal Chahal Transferred To Center

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top