

BMC Election Non Marathi Candidates
ESakal
बापू सुळे
मुंबई : मराठमोळ्या मुंबई महापालिकेत आता अमराठी चेहऱ्यांचा मोठा भरणा झाला आहे. पालिकेच्या निवडणूक रिंगणात विजयी ठरलेल्या २२७ नगरसेवकांमध्ये तब्बल ७६ जण अमराठी प्रतिनिधी आहेत. त्यांना भाजप, शिवसेना, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह सर्वच पक्षांचे पाठबळ मिळाले असले तरी सर्वाधिक ३३ जण भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत.