आता जेवढा कराल 'कचरा' तेवढा भरावा लागेल 'टॅक्स'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका, देशातील सर्वात शश्रीमंत महानगरपालिका. मात्र गेल्या काही काळात मुंबई महानगरपालिकेचं वैभव कमी होताना पाहायला मिळतंय. अशात आता मुंबई महानगरपालिका उत्पन्नवाढीसाठी नवनवे प्रयोग करताना पाहायला मिळतेय. याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिका आता थेट कचऱ्यावर कर लावणार आहे. 

मोठी बातमी -​ अंटार्टिकामध्ये आतापर्यंतच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद..

देशभरातील मंदीच्या सावटामुळे मुंबईतील बांधकाम क्षेत्रात मंदीचं वातावरण आहे. याचाच फटका मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाला बसलाय. याचसोबत बँकांचे व्याजदर पुढील आर्थिक वर्षात कमी होणार आहेत. त्यामुळे देखील मुंबई महानगरपालिकेने केलेल्या गुंतवणुकीमध्ये मोठी तूट येणार आहे. अशात अगदी कचऱ्यापासून ते जन्म प्रमाणपत्र देण्यापर्यंत अनेक सेवांवर मुंबई महानगरपालिका आता अतिरिक्त शुल्क आकारणार आहे. याबद्दलचा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत ठेवण्यात आलाय.

मोठी बातमी - अरेरे ! गोव्यात खास 'त्या'साठी जाणाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..

दरम्यान या नवनवीन मार्गाने मुंबई महानगरपालिकेत जमा होणारा अतिरिक्त महसूल नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यावर खर्च करणार आहे असं सांगितलं जातंय. येत्या आर्थिक वर्षांपासून मुंबई महानगरपालिका सध्या करत असलेल्या खर्चापेक्षा ९ टक्के अधिक खर्च नागरी सुविधांवर करणार आहे. यामध्ये दरवर्षी मुंबईला बसणारा पावसाचा फटका बसतो यासाठी सक्षम अशी गटारे आणि नाले उभारणी त्याचसोबत मुंबईतील कोस्टल रोडसारख्या प्रकल्पांवर करण्यात येणार आहे.  

mumbai municipal corporation planning to take tax on daily garbage produce

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai municipal corporation planning to take tax on daily garbage produce