esakal | अरेरे ! गोव्यात खास 'त्या'साठी जाणाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..
sakal

बोलून बातमी शोधा

अरेरे ! गोव्यात खास 'त्या'साठी जाणाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..

नव्या अर्थसंकल्पातील करवाढीचा परिणाम 

अरेरे ! गोव्यात खास 'त्या'साठी जाणाऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोवा राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकताच राज्याचा नवा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात भारतीय बनावटीची दारु आणि संपत्तीवरील कर अधिक वाढवला आहे. यामुळे आता गोव्याची खासियत मानली जाणारे मद्यच महागणार आहे.

हेही वाचा - दोन तास चार्च करा, 120 किलोमीटर पळवा

या निर्णयामुळे गोवा राज्याच्या पर्यटनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल अशी भिती विरोधी आमदार व मद्यविक्रेत्यांकडून वर्तविली जात आहे. दुसरीकडे गोव्याचा महसूलात यामुळे वाढ होणार असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गोव्याचे प्रसिद्ध मद्य अशी ओळख असणाऱ्या काजू फेणीवर देखील कर लावण्याचा निर्णय यंदा प्रथमच घेण्यात आला असून, यामुळे आता फेणीच्या एका बाटलीमागे 15 ते 20 रुपये अधिक मोजावे लागणार आहेत.

धक्कादायक - तो सतत तिचे चुंबन घ्यायचा...

या करवाढीमुळे गोव्याच्या पर्यटनाला फटका बसणार असल्याचे मत विरोधी पक्षनेते दिगबंर कामत आणि आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे. तसेच गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीने देखील या करवाढीबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दर्शविल्या आहेत. 

घर घेणही आता महाग 

गोव्यासारख्या एका उत्तम ठिकाणी आपले हक्काचे घर असावे असे अनेकांचे स्वप्न असते, मात्र नव्या अर्थसंकल्पात सरकारने रेडी रेकनरच्या दरात बदल करण्याचे ठरवल्याने आता गोव्यात घर घेणे आणखी महाग होणार आहे. आताच्या किंमतीपेक्षा 20टक्‍क्‍यांनी वाढ होणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

important news for tourist that goes to goa just to drink

loading image