मुंबई : यंदाच्या गणेशोत्सवात अधिकाधिक पर्यावरणपूरक विसर्जन सुनिश्चित करण्यासाठी महानगरपालिका कृत्रिम तलावांची संख्या वाढवणार आहे. गेल्या वर्षी २०४ कृत्रिम तलावांची उभारणी करण्यात आली होती. यंदा ही संख्या वाढवून विसर्जनासाठी सुविधा अधिक सुटसुटीत केली जाणार आहे, अशी माहिती उप आयुक्त व गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी दिली.