Tree Cutting
sakal
मुंबई : मलबार हिल परिसरातील हिरवाईवर पुन्हा एकदा कुऱ्हाड चालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बी. जी. खेर मार्गावरील फिरोजशाह मेहता उपजलाशयाच्या नवीन गॅलरीसह अतिरिक्त जलाशयाच्या बांधकामासाठी तब्बल ८४ झाडे हटविण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे.