
मुंबईच्या प्रभाग रचनेवर आयोगाचे शिक्कामोर्तब
मुंबई : मुंबई महापालिकेच्या २३६ सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवला आहे. मुंबईतील वाढीव सदस्यसंख्या; तसेच प्रभाग रचना निश्चितीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी २३६ नगरसेवकांना आपल्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करता येईल.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी मुंबई महापालिकेला प्रभागनिश्चिती आणि वाढीव सदस्यसंख्येसाठी समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेने समिती नेमत नवीन प्रभाग रचनेवर हरकती व सूचना मागवल्या होत्या. मुंबई महापालिकेकडे आलेल्या सूचना व हरकतींचा अहवाल हा समितीने राज्य निवडणूक आयोगाकडे दाखल केला होता. त्यानंतरच अंतिम अधिसूचना ही राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केली.
केडीएमसीची प्रभाग रचना प्रसिद्ध
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना आज (ता. १३) प्रसिद्ध करण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी ४४ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत. त्यातून १३३ सदस्य निवडून येणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार महापालिकेने निवडणूक प्रारूप प्रभाग रचना आराखडा जाहीर केला होता. त्यात ३७५ हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्यावर सुनावणी झाली. निवडणूक आयोगाने त्यातील ३६४ हरकती मान्य करत त्यात फेरबदल करून ही अंतिम यादी जाहीर केली आहे.
Web Title: Mumbai Municipal Corporation Ward Structure Confirmation Notification Was Issued State Election Commissioner
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..