esakal | मुंबई महानगरपालिकेचा पर्यावरणपूरक वाहनांवर भर
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

मुंबई महानगरपालिकेचा पर्यावरणपूरक वाहनांवर भर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महानगरपालिके पर्यावरण पूरक तसेच प्रदूषणमुक्त असणाऱ्या इलेक्ट्रीक वाहनांवर भर द्यायचा निर्णय घेतला असून पाहिल्या टप्प्यात 10 टक्के ई वाहनं करण्यात येणार आहेत. त्यातील 83 ई वाहन पालिकेच्या ताफ्यात मार्च अखेरपर्यंत दाखल होणार आहेत.याशिवाय पालिकायसेच खासगी वाहनांसाठी शहरात चार्जिंग स्टेशन ही उभारण्यात येणार आहेत.

केंद्र आणि राज्य सरकारने प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर करण्याचे संकेत विविध यंत्रणांना दिले आहेत.पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील पर्यावरणपूरक वाहनांचा अधिकाधिक वापर करण्याबाबत आग्रही आहेत. त्यांनुसार पालिकेने आपल्या ताफ्यातील 10 टक्के अत्याधुनिक पर्यावरण पूरक वाहनं खरेदीचा निर्णय घेतला आहे. पाहिक्या टप्प्यात 83 वाहन घेण्यात येणार असून यासाठी लवकरच टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. यावर 35 कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यासाठी ई वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून कोटेशन मागवण्यात आले असून त्याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

हेही वाचा: BMC : महापालिकेच्या शाळांमध्ये वर्गात 25 विद्यार्थ्यांना प्रवेश

महापालिकेच्या ताफ्यातील एकूण वाहनंमध्ये आता 10 टक्के ई वाहनांचा समावेश होणार आहे. याशिवाय जुनी,नादुरुस्त किंवा बदली करण्याजोगे वाहनांच्या जागी देखील ई वाहन खरेदी करण्यात येणार आहेत. याशिवाय भविष्यातील खरेदी करण्यात येणारी वाहन ही पर्यावरण पूरक असण्यावर भर देण्यात येणार आहे.

हेही वाचा: राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

85 ठिकाणी चार्जिंग स्टेशन

महानगरपालिका पर्यावरण पूरक वाहनांवर भर देत असल्याने चार्जिंग स्टेशन उभारण्यावर जोर देखील देणार आहे. शहरात 85 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय झाला असून कवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. पालिकेसह खासगी वाहन चालक देखील या चार्जिंग स्टेशनचा वापर करू शकणार आहेत.

loading image
go to top