Mumbai : पालिका रुग्णालयात मास्क लावणे बंधनकारक

६० वर्ष वयावरील नागरिकांनाही मास्क लावण्याचे आवाहन
मास्क
मास्क sakal

मुंबई : कोरोनाच्या वाढू लागल्याने महापालिका सज्ज झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. ६० वयावरील ज्येष्ठ नागरिकांना मास्कची सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी वावरताना मास्क लावावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी निर्देश दिले आहेत.

आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. रोजच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार मे महिन्यामध्ये कोविड संसर्ग बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका सतर्क झाली आहे. महानगरपालिकेची सर्व रुग्णालये, तसेच सर्व खासगी रुग्णालयांनीही कोविड उपचारांसाठी सुसज्ज रहावे,

अशी सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केली आहे. पालिकेच्या सर्व रुग्णालयातील कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. विशेषतः ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांना सक्ती नसली तरी त्यांनी गर्दीच्या ठिकाणी वावरताना खबरदारीचा उपाय म्हणून मास्क लावणे आवश्यक असल्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मात्र सर्व कर्मचारी, रूग्ण तसेच येणाऱ्या अभ्यागतांना यापुढे मास्क सक्तीचे असेल असे निर्देश चहल यांनी दिले आहेत. गृह विलगीकरणाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे पुन्हा जारी केली जाणार आहे. कोविड चाचण्या, विभागीय नियंत्रण कक्ष, वैद्यकीय प्राणवायू व औषधसाठा उपलब्धता, खासगी रुग्णालयांमधील कोविड सज्जता आदी सर्व बाबींचा आयुक्तांनी आढावा घेतला.

कोविडच्या वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आरोग्य व्यवस्थेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीस अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, आशीष शर्मा, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार यांच्यासह सर्व संबंधित सहआयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त तसेच खातेप्रमुख उपस्थित होते.

बेड सज्ज ठेवा

वैद्यकीय अंदाजानुसार येत्या मे महिन्यामध्ये कोविड संसर्गाच्या रूग्णांची संख्या वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे, मुंबईतील महापालिकेच्या सोबतच खासगी रुग्णालयांच्या ठिकाणीही रूग्णशय्या सज्ज ठेवाव्यात असे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

आयुक्तांच्या सूचना

- आवश्यक असणारे ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्स त्याचप्रमाणे औषधसाठा व इतर वैद्यकीय सामुग्री यांचा आढावा घेवून त्यांची आवश्यकता असल्यास खरेदीची प्रक्रिया सुरु करावी.

- कोविड चाचण्यांची संख्या वाढवावी, चाचण्यांची संख्या वाढवतानाच खासगी प्रयोगशाळा संचालकांची लवकरात लवकर बैठक घ्यावी.

- रूग्णालयांच्या ठिकाणी असलेले ऑक्सिजन प्लांट सुस्थितीत कार्यरत आहेत, ऑक्सिजनची मागणी व पुरवठा यांचा ताळमेळ आहे, या सर्व बाबींचे परीक्षण (ऑडिट) रुग्णालयांनी करावे.

- सर्व विभागीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वॉर रुम) यांच्या कामकाजाचा तातडीने फेरआढावा घ्यावा. आवश्यक ते सर्व मनुष्यबळ, यंत्रणेसह ते कार्यरत राहतील, याची दक्षता घ्यावी.

- कोविड जागरुकता महत्त्वाची असल्याने जनजागृतीवर भर द्यावा.

- ६० वर्षेपेक्षा अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी, सहव्याधी असलेल्या नागरिकांनी मास्कचा शक्यतो, सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी वापर करावा. त्याबाबतची सूचना आरोग्य विभागाकडून तातडीने प्रसारित करण्यात यावी.

- मुंबईतील महानगरपालिकेची रुग्णालये व खासगी रुग्णालये यांनी कोविड पूर्वसज्जतेचा भाग म्हणून रंगीत तालीम (मॉक ड्रिल) करावी.

- मुंबईतील सर्व खासगी रुग्णालयांनी देखील कोविड बाधितांवर उपचारांसाठी संपूर्ण यंत्रणा सुसज्ज करावी.

- सर्व रूग्णालयांमध्ये शस्त्रक्रियेला सामोरे जाणाऱया रुग्णांची कोविड चाचणी करण्यात यावी. जर असा रुग्ण कोविड बाधित आढळला आणि जर शस्त्रक्रिया आपत्कालीन स्वरुपाची नसेल तर ती शस्त्रक्रिया पुढे ढकलावी.

- कोविड बाधित तसेच लक्षणं विरहीत रुग्ण लक्षात घेता, आरोग्य खात्याने कोविड रूग्णांच्या गृह विलगीकरण (होम आयसोलेशन) संदर्भात नव्याने मार्गदर्शक सूचना प्रसारित कराव्यात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com