
Mumbai-Naded Vande Bharat Express Late
ESakal
मुंबई : मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस (ट्रेन क्र. २०७०६) रविवारीच्या अचानक विलंबामुळे प्रवाशांमध्ये गंभीर असंतोष पसरला आहे. मूळ वेळेनुसार दुपारी १:१० वाजता सीएसएमटीहून निघणारी ट्रेन तब्बल सहा तास उशिरा, संध्याकाळी ७:३० वाजता सुरू झाली. या विलंबाची माहिती प्रवाशांना सकाळी सुमारे १०:३० वाजता दिली गेली, ज्यामुळे दिवाळी सणासाठीचे नियोजन पूर्णपणे बिघडले.