esakal | मुंबईकरांच्या त्रासात भर, नायरचे डॉक्टर सार्वजनिक सुट्टीवर जाण्याच्या तयारीत
sakal

बोलून बातमी शोधा

nair.jpg

काय आहेत डॉक्टरांच्या मागण्या?

मुंबईकरांच्या त्रासात भर, नायरचे डॉक्टर सार्वजनिक सुट्टीवर जाण्याच्या तयारीत

sakal_logo
By
Team eSakal

मुंबईत कोरोनाचे संकट वाढत असताना नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी आज दुपारी चार वाजल्यापासून सार्वजनिक सुट्टीवर जाण्याचा इशारा दिला आहे. आपल्या मागण्या मान्य न केल्यास सार्वजनिक सुट्टीवर जाऊ असे या डॉक्टरांनी म्हटले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या मागण्यांचे पत्र कालचं अधिष्ठाताना देत, सार्वजनिक सुट्टीचा इशारा दिला होता. कोविड पेशंटसाठी रुग्णालयातील इतर रुग्णांचे बेड जबरदस्ती खाली केले जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. कोविड बरोबर इतर आजारांवरही उपचार व्हावेत, अशी या डॉक्टरांची भूमिका आहे. नायर रुग्णालयाला पूर्णपणे कोविड रुग्णालय बनवण्यास डॉक्टरांचा विरोध आहे. 

कोविड प्रमाणे इतर रुग्णांवरही उपचार व्हायला हवेत. त्याचबरोबर कोविड पेशंटसाठी इतर रुग्णालयातही बेड वाढवायला हवेत, अशा मागण्या डॉक्टरांनी केल्या आहेत. मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुढच्या काही दिवसात बेडस, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स या सुविधा अपुऱ्या पडू शकतात. 

जया बच्चन भरणार ‘तृणमूल’च्या प्रचारात रंग; ममतादीदींसाठी घेणार सभा

त्यामुळे मुंबईत प्रशासनाने पालिका रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी बेड वाढवण्यास सुरुवात केली आहे. पण महापालिकेच्या नायर रुग्णालयात या निर्णयाला मार्डच्या डॉक्टरांकडून विरोध होतोय. नायरमध्ये किडनीचा आजार असलेल्या रुग्णांवर डायलसिस केले जाते. त्याशिवाय कॅन्सरग्रस्त रुग्णांवर केमोथेरपीनेही उपचार केले जातात. पण सध्या अन्य आजारांपेक्षा कोरोनाबाधितांवर उपचार करण्यावर भर दिला जात आहे. त्या दृष्टीने नायर रुग्णालयात तयारी सुरु आहे. पण हा निर्णय घेताना, डॉक्टरांना विश्वासात न घेतल्याने त्यांच्या मनात नाराजीची भावना आहे.

(संपादन - दीनानाथ परब)
 

loading image