भिवंडीमार्गे ‘समृद्धी’ने प्रवास, नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज; कोंडीमुक्त प्रवासामुळे वेळ, इंधन वाचणार

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असून इंधनाची बचतही होणार आहे.
Mumbai Nashik Highway

Mumbai Nashik Highway

ESakal

Updated on

ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव खाडीवरील नवा उड्डाणपूल वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. ठाण्यावरून भिवंडीमार्गे जाणारा हा मार्ग ‘समृद्धी’ला जोडला असल्याने ठाणे-भिवंडी मार्गावरील वाहतुकीला अक्षरशः ‘समृद्धी’ची गती मिळणार आहे. अनेक वर्षे कोंडी, खड्डे आणि पावसाळ्यातील भीषण अडथळ्यांनी त्रस्त असलेला हा मार्ग अखेर सुसाट बनला असून कोंडीमुळे प्रवासाचा लांबणारा वेळ आणि इंधनाची बचतही होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com