Mumbai-Nashik Highway Traffic update : मुंबई-नाशिक महामार्गावर कोंडी

वीकेंडला निघालेल्या प्रवाशांचा खोळंबा
बई-नाशिक महामार्गावर
बई-नाशिक महामार्गावरsakal

खर्डी : मुंबई-नाशिक महामार्गावर कसाऱ्याजवळ ट्रेलर कोसळल्‍याने महामार्गावरील दोन्ही मार्गांवर शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या होत्‍या. यादरम्‍यान दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. कसारा ग्रामीण पोलिस व घोटी महामार्ग पोलिस यांच्या अथक प्रयत्नांनंतर पहाटे चार वाजता बंद झालेली वाहतूक दुपारी १२ वाजण्‍याच्या आसपास सुरळीत करण्यात आली.

परीक्षा संपून सुट्ट्या लागल्याने लोक मोठ्या संख्येने फिरायला बाहेर पडले आहेत. अनेकांनी गावी जाण्याचा बेत आखला आहे. त्यामुळे महामार्गावर प्रवासी वाहनांची वर्दळ वाढली आहे. शनिवारी मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातग्रस्त ट्रेलर आणि जुन्या कसारा घाटात सुरू असलेल्या रस्तेदुरुस्तीच्या कारणामुळे मुंबई आणि नाशिक दोन्ही मार्गिकांवर लहान-मोठी वाहने कोंडीत सापडली.

कसारा बायपास ते कसारा थळघाट अशा पाच ते सात किमी अंतरावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पहाटे चार वाजल्यापासून नाशिक-मुंबई मार्गावर वाहतूक कोंडी झाली; तर सकाळी ७ वाजता मुंबई-नाशिक मार्गावर गाड्यांमुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या वेळी वाहनचालक व प्रवाशांची अन्न-पाण्याविना गैरसोय झाल्याने प्रवासी प्रचंड संताप व्यक्त करीत होते.

यामुळे मुंबईहून नाशिककडे निघालेल्‍या व नाशिकहून मुंबईकडे निघालेल्या वाहनधारकांनी महामार्गाची वाट वाकडी करून कसारा गावातून वाहने फिरवली. यामुळे गावातील मुख्य रस्ता वाहनांच्या वर्दळीने कोंडीत सापडला होता. आठवड्याच्या अखेरीस मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

तब्‍बल आठ तासांच्या प्रयत्‍नांनंतर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त ट्रक बाजूला करून वाहतूक कोंडी फोडली.

खर्डी : मुंबई-नाशिक महामार्गावर कसाऱ्याजवळ ट्रेलर कोसळल्‍याने महामार्गावरील दोन्ही मार्गांवर वाहनांच्‍या लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या. या दरम्‍यान दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com