Mumbai : मुंबईत नौदल दिवस साजरा...नौदल दिनी शूरवीरांना श्रद्धांजली

मुंबईच्या नौदल डॉकयार्ड येथे नौदल दिवस रविवारी दिमाखात साजरा झाला
Navy Day
Navy Daysakal

मुंबई : मुंबईच्या नौदल डॉकयार्ड येथे नौदल दिवस रविवारी दिमाखात साजरा झाला. या समारोहला नौदलाच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. नौदल दिनानिमित्त पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंग यांनी गौरवस्तंभावर पुष्पहार अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. या सोहळ्यासाठी एक औपचारिक परेड करण्यात आली. नौदल डॉकयार्ड मुंबई येथील गौरव स्तंभ या स्मारकाचे उद्घाटन 04 डिसेंबर 2020 रोजी भारतीय नौदलाच्या विजय, शौर्य, निस्वार्थीपणा आणि धैर्य स्मरणार्थ बांधण्यात आले.

भावी पिढ्यांना शूरवीरांच्या शौर्याचे स्मरण व्हावे आणि त्यांच्या शौर्याला आदरांजली वाहावी या उद्देशाने स्मारकाच्या भिंतींवर 285 जवानांची नावे कोरण्यात आली आहेत. या स्मारकावर गोवा मुक्ती संग्राम, 1971 भारत-पाक युद्ध, दहशतवादविरोधी कारवाया आणि शौर्याच्या कारवायांमध्ये भाग घेतलेल्या शूर जवानांच्या नावांचा समावेश आहे. कमोडोर एसएन सिंग (सेवानिवृत्त), 1971 च्या युद्धातील दिग्गज, लेफ्टनंट कमांडर फारोख तारापोर (निवृत्त) आणि अन्य निवृत्त अधिकाऱ्यांनी देखील पुष्पहार अर्पण करत शहिदांना वंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com