मुंबई NCB ची मोठी कारवाई; नांदेडमध्ये 1.1 टन गांजा जप्त | Mumbai NCB update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hashish seized

मुंबई NCB ची मोठी कारवाई; नांदेडमध्ये 1.1 टन गांजा जप्त

रोहिणी गोसावी : सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या एनसीबीनं (Mumbai NCB) नांदेडजवळ (nanded) 1127 किलो गांजानं भरलेला ट्रक जप्त (hashish seized) केलाय. या गांजाची बाजारातली (Hashish price) किंमत किमान 10 कोटीपेक्षा (above ten crore) जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. गांजानं भरलेला हा ट्रक आंध्रप्रदेशातून (Andhra Pradesh) आला होता, आणि हा गांजा जळगावला (Jalgaon) उतरवण्यात येणार होता, तिथून तो राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पाठवला जाणार होता.

हेही वाचा: कंगना राणावत विरोधात पालघरमध्ये तक्रार

गांजानं भरलेला ट्रक राज्याची सीमा पार करत असतानाच एनसीबीला त्याबद्दल माहीती मिळाली होती, त्यानंतर त्या ट्रकचा पाठलागलकरत पहाटे 4 च्या दरम्यान नंदेडजवळ या ट्रकला ताब्यात घेण्यात एनसीबीला यश आलं. ट्रकमध्ये असलेल्या दोन व्यक्तींनाही एनसीबीनं ताब्यात घेतलंय. एवढ्या मोठ्या प्रमाणात पकडलेला गांजा हा एनसीबीच्या सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक आहे. दोन जणांना अटक केल्यानंतर आता एसीबी पुढचा तपास करतेय. गांजा कुणी पाठवला आणि तो जळगावमधून कोण पुढे पाठवणार होतं याचाही तपास करण्यात येतोय़

loading image
go to top