मुंबई: ड्रग्स प्रकरणातील आरोपीचा टॉयलेट क्लिनर पिऊन आत्महत्येचा प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jail

NCB च्या कार्यालयात घटना घडल्याची माहिती

मुंबई: ड्रग्स केसमधील आरोपीनं टॉयलेट क्लिनर प्यायलं अन्...

मुंबई: ड्रग्स प्रकरणातील (Drugs Case) आरोपी असलेल्या एकाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच NCBच्या कार्यालयातच आपलं जीवन संपवण्याचा (Suicide) प्रयत्न केल्याची माहिती आहे. NCBच्या मुंबई (Mumbai Office) येथील कार्यालयात एजाझ सायको (Ejaz Psycho) नावाच्या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला कार्यालयात घेऊन गेल्यानंतर वॉशरूम (Washroom) वापरण्याच्या बहाण्याने तो आतमध्ये गेला आणि त्यावेळी तेथे असलेलं टॉयलेट क्लिनर (Toilet Cleaner) प्राशन करून त्याने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. (Mumbai NCB Office Drugs case accused tries to end life, consumes toilet cleaner)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्सचा अँगल आल्यापासून NCB आणि त्यांची कार्यपद्धती बरीच चर्चेत असते. सुशांतच्या केसमध्ये NCB ने अनेकांना अटक केली असून काहींचा सुशांतच्या मृत्यूशी थेट संबंध आहे की नाही याता तपासदेखील NCB करत आहे. त्यामुळे NCBच्या कार्यालयाबाहेरील प्रत्येक छोट्या-मोठ्या हालचालींवर प्रसारमाध्यमे लक्ष ठेवून असतात. अशातच एजाझ सायको याचे प्रकरण घडले. एजाझने अचानक टॉयलेट क्लिनर प्राशन करून जीव देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला त्वरीत राज्य सरकारच्या जे जे रूग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याची तब्येत चिंताजनक नसल्याचे सांगण्यात येत असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. एजाझ सायकोने आत्महत्येचा प्रयत्न का केला असावा? हे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

याशिवाय, NCBने नुकतीच एक महत्त्वाची कारवाई केली. NCBने दोन ड्रग्ज पेडलरना ताब्यात घेतलं. हरीश खान आणि साकीब खान अशी या दोघांची नावं आहेत. सुशांतच्या मृत्युनंतर अनेक दिवस विविध प्रकारचे तर्कवितर्क लढवले जात होते. या प्रकरणात डॅग्सचा अँगल आल्यानंतर तपासाला वेग आला होता. पण हे दोघे खान बंधू मात्र फरार आरोपी होते. NCB ने या दोघांना शोधून अटक केली. महत्त्वाची बाब म्हणजे सुशांतला दिल्या जाणाऱ्या ड्रग्जचा पुरवठा हा हरीश खान याच्याकडूनच होत असल्याचा संशय NCBला आहे. त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे.