मुंबईच्या वकिलाची MD ड्रगची फॅक्टरी उद्ध्वस्त| Mumbai NCB Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai NCB

मुंबईच्या वकिलाची MD ड्रगची फॅक्टरी उद्ध्वस्त

मुंबई : मुंबईतल्या एका वकिलाचं कोल्हापुरच्या चंदगडमध्ये असलेलं एमडी ड्रगचं उत्पादन (MD Drugs Production) युनिट मुंबईतल्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं उद्ध्वस्त केलंय. आणि मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त (Drug Seized) करण्यात आला. बांद्रा अंमलीलपदार्थ विरोधी पथकानं काही दिवसांपूर्वी एका महिला ड्रग पेडलरला 50 ग्रॅम एमडी ड्रगसह अटक केली होती.

हेही वाचा: मुंबई : भारतातील प्रमुख ठिकाणच्या कार्यालयांचे भाडे वर्षभर स्थिर

त्यानंतर तिच्याकडे असलेलं एमडी ड्रग हे कोल्हापुरातून आलंय अशी माहीता तपासातून उघड झाली होती, त्याचाच माग काढत अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, सहायक पोलिस निरीक्षक वाहिद पठाण, पोलिस उपनिरीक्षक पवळे यांची टीम चंदगडजवळच्या ढोलकरवाडी गावात पोहोचलं, तिथल्या एका फार्महाऊसवर हे उत्पादन युनिट असल्याची माहिती होती.

2 कोटी 35 लाखाचा मुद्देमाल जप्त

छापा टाकलेल्या ठिकाणी 38 किलो एमडी तयार करण्याचा कच्चा माल, आणि त्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणं पथकानं जप्त केली आहेत. तसंच 120 ग्रॅम तयार एमडी ड्रगही मिळालं आहे. जप्त केलेल्या एकुण मुद्देमालाची किंमत 2 कोटी 35 लाख आहे.

पोल्ट्री आणि गोटफार्मच्या आड सुरु होतं उत्पादन

राजकुमार राजहंस नावाच्या वकिलाचं ते फार्महाऊस असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोल्ट्री आणि गोटफार्मच्या आड एमडी ड्रग बनवण्याचं काम सुरु होतं जेणेकरुन कुणाला संशय येऊ नये. आरोपी राजकुमार राजहंस हा याच गावचा रहिवासी आहे, वकिली व्यवसायानिमित्त सध्या मुंबईत रहात होता. जशी गरज पडेल तसं फॅक्टरीत जाऊन एमडी ड्रग घेऊन येत होता. मुंबई हे त्याच्या वितरणाचं प्रंमुख ठिकाण होतं. अशी माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली.

केअर टेकरला अटक, मुख्य आरोपी फरार

अंमली पदार्थ विरोधी पथकानं छापा टाकला, तेव्हा तीथं काम करणाऱ्या व्यक्तीला अटक केली, मुख्य आरोपी राजकुमार राजहंस हा फरार असुन त्याचा शोध घेत असल्याचंही दत्ता नलावडे यांनी सांगितलं.

loading image
go to top