esakal | मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर 0.7 % पर्यंत घसरला!
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर 0.7 % पर्यंत घसरला!

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत कोरोना संसर्ग नियंत्रणात (Corona Infection) दिसत असून रुग्णवाढीचा सरासरी (Corona patients average) दरही 0.7 % पर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 909 दिवसांवर गेला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 % आहे. रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने सक्रिय रुग्णांचा (Active patients) आकडा कमी होऊन 7,484 हजारांवर आला आहे. मुंबईत (Mumbai New Corona Patients) आज 504 नवीन रुग्ण सापडले. मुंबईतील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 7,27,141 इतकी झाली आहे. आज 736 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत 7,01,710 रुग्ण कोरोनामुक्त(Corona Free Patient) झाले आहेत. आतापर्यंत 74,99,594 कोरोना चाचण्या (corona Test) करण्यात आल्या. ( Mumbai New Corona Patients Average down zero point seven percent)

मुंबईत आज दिवसभरात 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. मुंबईतील मृतांचा आकडा 15 हजार 612 इतका झाला आहे. आज मृत झालेल्यापैकी 9 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृत्यू झालेल्यांमध्ये 5 पुरुष तर 8 महिला रुग्णांचा समावेश होता. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 5 रुग्णाचे वय 40 आणि 60 च्या दरम्यान होते.तर 8 रुग्णांचे वर 60 वर्षाच्या वर होते.

हेही वाचा: शाळेची घंटा वाजवा, 85 टक्के पालकांची मुलांना शाळेत पाठवायची तयारी!

धारावी मध्ये आज 3 रुग्ण आढळले असून  धारावीतील एकूण रुग्णांचा आकडा 6913 आहे. तर धारावी मध्ये केवळ 19 सक्रिय रुग्ण आहेत. दादर मध्ये आज 9 रुग्ण आढळले. धारावीतील एकूण रुग्णसंख्या  9741  झाली आहे. माहीम मध्ये आज 7 नवे रुग्ण सापडले असून माहीम मधील एकूण रुग्ण 10,069 झाले आहेत. जी उत्तर मध्ये आज 19 नव्या रुग्णांची भर पडली असून एकूण रुग्णांचा आकडा 26,723 झाला आहे. 

loading image