Mumbai Crime News
esakal
Mumbai Crime News : नववर्ष साजरे करण्याच्या बहाण्याने मिठाई देण्यासाठी घरी बोलावून एका तरुणीने आपल्या प्रियकरावर अत्यंत गंभीर हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुंबईत उघडकीस आली आहे. या प्रकरणात जोगिंदर लखन महतो (वय ४४, रा. जांभळीपाडा) असे जखमी व्यक्तीचे नाव असून ते खासगी वाहनचालक म्हणून काम करतात. गेल्या १८ वर्षांपासून ते कुटुंबासह मुंबईत वास्तव्यास आहेत.