esakal | तब्बल ५१ लसीकरण केंद्र बंद, एक दोन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा
sakal

बोलून बातमी शोधा

corona vaccine shortage

तब्बल ५१ लसीकरण केंद्र बंद, एक दोन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसीचा साठा

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई: कोरोना लसीसाठी पालिकेनं कंबर कसली आहे. मात्र सध्या लसीच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येत आहेत. तर लस तुटवडा असल्याने फक्त पालिका लसीकरण केंद्रांनाच लस पुरवठा पालिका करत आहे. मात्र पालिकेकडे केवळ एक दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा उपलब्ध असल्याचे पालिका अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, लस टोचून घेण्यास उत्सुक मुंबईकर मात्र लस मिळत नसल्याने संताप व्यक्त करत आहेत.

लस तुटवड्यामुळे खासगी लसीकरण केंद्र बंद असल्याचा मंगळवार हा तिसरा दिवस ठरला. शुक्रवार पासून लस तुटवड्यास सुरुवात झाली. यात रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असून त्या दिवशी लसीकरण केले जात नाही. सोमवारपर्यंत 32 खासगी लसीकरण केंद्र बंद असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली असून सोमवारी संध्याकाळपर्यंत या बंद लसीकरण केंद्राच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या 51 वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत सर्व गटांमध्ये आता पर्यंत 20 लाख 41 हजार 571 एवढे लसीकरण झाल्याचे माहिती लसीकरणाचा तक्त्यात सांगितले आहे.

राज्यात 1 कोटी 26 लाख 59 हजार 954 एवढे लसीकरण झाले आहे. मुंबईतील प्रतीक्षेत असलेल्या उत्सुक मुंबईकरांना लसीचा पुरवठा कधी होईल अशी विचारणा होत आहे. यावर पालिका आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी सांगितले की, एक दोन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा आहे. लस साठा कमी असल्याने खासगी रुग्णालयांना लस देण्यात येणार नाही. त्यामुळे बंद लसीकरण केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सध्या अंदाजे 1 लाखपर्यंत लस उपलब्ध असून फक्त पालिका लसीकरण केंद्रांना लस देण्यात येत असल्याचे डॉ. गोमारे म्हणाल्या.

हेही वाचा: मुंबईत कोरोना रुग्णाकडून नर्सवर चाकू हल्ला

फक्त 75 केंद्रे सुरु राहणार

रात्री साठा येण्याची शक्यता आहे. बुधवारी केवळ 128 पैकी 75 सेंटर लसीकरण केंद्र सुरू राहतील. पालिका, सरकारी 13 आणि 38 खासगी बंद झाले आहेत, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

mumbai news 51 public and private corona vaccination centers closed

(संपादन- पूजा विचारे)

loading image
go to top