esakal | निरव मोदीसाठी ऑर्थर रोड जेलमधील विशेष सेल सज्ज; कोठडीत 'या' आहेत सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

निरव मोदीसाठी ऑर्थर रोड जेलमधील विशेष सेल सज्ज; कोठडीत 'या' आहेत सुविधा

निरव मोदीला मुंबईला आणल्यास, त्याच्यासाठी ऑर्थर कारागृहातील बॅरक क्रमांक 12 मधील तीन विषेश कोठडीपैकी कोणत्याही एका कोठडीत ठेवण्यात येईल.

निरव मोदीसाठी ऑर्थर रोड जेलमधील विशेष सेल सज्ज; कोठडीत 'या' आहेत सुविधा

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई, ता. 26 : फरार हिरे व्यापारी निरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा मार्ग इंग्लडच्या कोर्टाने मोकळा केला. या निर्णयामुळे मोदीच्या प्रत्यार्पणाची शक्यता वाढली असून, या पार्श्वभूमीवर ऑर्थर जेलमधील त्याच्यासाठीची विशेष कोठडी सज्ज ठेवण्यात आली आहे. पंजाब नॅशनल बँकेचे कोट्यवधीचे कर्ज बूडवून निरव मोदी मार्च 2016 पासून परदेशात फरार झाला आहे. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाला वरीष्ठ कोर्टात आव्हान देण्याचा पर्याय अजूनही निरव मोदीकडे आहे. 

महत्त्वाची बातमी : शेअर बाजारात भूकंप, 'दलाल स्ट्रीट'साठी आजचा दिवस ठरला 'ब्लॅक फ्रायडे' !

निरव मोदीला मुंबईला आणल्यास, त्याच्यासाठी ऑर्थर कारागृहातील बॅरक क्रमांक 12 मधील तीन विषेश कोठडीपैकी कोणत्याही एका कोठडीत ठेवण्यात येईल. या बराकची सुरक्षा व्यवस्था मजबूत आहे. निरव मोदीला जेलमध्ये ठेवण्यासाठीची तयारी पुर्ण झाली आहे. निरव मोदीचे प्रत्यार्पण झाल्यास, जेलची विशेष कोठडी त्याच्यासाठी सज्ज आहे, असे तयार आहे असे सूत्रांनी सांगितले.

निरव मोदीच्या प्रत्यार्पणासंदर्भात भारताने गुरुवारी एक मोठी कायदेशीर लढाई जिंकली. ग्रेट ब्रिटेनच्या कोर्टाने निरव मोदीला भारताच्या ताब्यात देण्यासाठी हिरवा कंदील दिला होता. भारतीय न्यायालयात न्याय मिळणार नाही असा निरव मोदीचा युक्तीवाद कोर्टाने फेटाळून लावला होता. मार्च 2019 पासून निरव मोदी लंडनच्या तुरुंगात खितपत पडला आहे, त्याने जामीनासाठी अनेक अर्ज केले, मात्र कोर्टाने ते फेटाळून लावले आहे.  2019 मध्ये राज्याच्या तुरुंग विभागाने निरव मोदीच्या कोठडीसाठी केलेली विषेश तयारीची माहिती केंद्र सरकारकडे सादर केली होती.

महत्त्वाची बातमी : राज्यांतर्गत वाहन बदलीसाठीची 'ही' महत्त्वाची अट रद्द; परिवहन आयुक्तांचे आदेश, नागरिकांना मोठा दिलासा

अशी असेल निरव मोदीची कोठडी : 

1. बॅरक क्रमांक 12 मधील तीन कोठडीपैकी एक कोठडी मिळणार
2. खासगी वापरासाठी तीन चौरस मिटर जागा मिळेल 
3. कॉटन चटई, उशी, बेडशीट आणि ब्लँकेट दिले जाणार
4. या सेलमध्ये आवश्यक प्रकाश, वेंटीलेशन असेल 
5. वैयक्तीत वस्तू ठेवण्यासाठी कपाट
6. या कोठडीत तुलनेने इतर कैद्यांची संख्या कमी असणार 

mumbai news arthur road jail barrack no 12 is ready for dimond businessman nirav modi

loading image