राज्यांतर्गत वाहन बदलीसाठीची 'ही' महत्त्वाची अट रद्द; परिवहन आयुक्तांचे आदेश, नागरिकांना मोठा दिलासा

राज्यांतर्गत वाहन बदलीसाठीची 'ही' महत्त्वाची अट रद्द; परिवहन आयुक्तांचे आदेश, नागरिकांना मोठा दिलासा

मुंबई ता 26 : राज्यांतर्गत वाहन मालकाच्या पत्ता बदलाकरीता तसेच वाहनाच्या मालकीच्या हस्तांतरणाकरीता नाहरकत प्रमाणपत्राची (एनओसी) प्रचलित अट होती. एनओसी देण्यासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी सुद्धा केली जात होती. त्यामुळे ही प्रचलित पद्धत बंद करण्याचा निर्णय परिवहन आयुक्त ढाकणे यांनी घेतला असून, यानंतर एनओसीची गरज नसल्याचे आदेश सर्व आरटीओ अधिकाऱ्यांना दिले आहे.

मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 48 अन्वये एका राज्यातून दूसन्या राज्यात वाहन हस्तांतरण पत्ता बदल करण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र जारी करण्याची तरतूद आहे. मात्र, नोंदणीकृत असलेल्या वाहनांसंदर्भात वाहन मालकाचा राज्यांतर्गत पत्ता बदलाकरीता तसेच वाहनाच्या मालकीच्या हस्तांतरणाकरीता ही तरतुद लागू नसल्याचे परिवहन आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

प्रचलित कार्यपद्धतीप्रमाणे एका कार्यालयामधून दुसऱ्या कार्यालयात वाहन हस्तांतरण आणि पत्ता बदल या कामासाठी नमुना क्रमांक 28 मध्ये ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली जाते. तथापि, वाहन 4.0 या प्रणालीवर ज्या वाहनांची माहिती उपलब्ध आहे. अशा वाहनांच्या बाबत नमुना 28 मधील ना-हरकत मागवण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अशा नाहरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात येऊ नये असे आदेश परिवहन आयुक्तांनी राज्यातील आरटीओ अधिकाऱ्यांना दिल्याने वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

mumbai news condition of NOC transfer certificate is now not mandatory for inter state vehicle transfer

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com