

Mumbra Railway Accident case Update
ESakal
मुंबई : मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर रविवारी (ता.३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ जून रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास कसारा-सीएसएमटी आणि सीएसएमटी-कर्जत या दोन लोकल गाड्या जात असताना मुंब्रा स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले होते.