विमानाच्या शौचालयातील टिश्यू पेपरखाली लपवलं होतं लाखोंचं सोनं, अधिकारी निघालेत वरचढ आणि हातात पडल्यात बेड्या

विमानाच्या शौचालयातील टिश्यू पेपरखाली लपवलं होतं लाखोंचं सोनं, अधिकारी निघालेत वरचढ आणि हातात पडल्यात बेड्या

मुंबई : विमानाच्या शौचालयात 82 लाख रुपयांचे सोने लपवलेल्या प्रवाशाला अटक करण्यात सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. आरोपी दुबईवरून मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळावर आला होता.

दुबईवरून आलेल्या प्रवाशाने शौचालयात सोने लवपले असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार शोधमोहिम राबवून 16 सोन्याचे लगड्या जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. जप्त करण्यात आलेले सोने 1863 ग्रॅम असून त्याची किंमत 82 लाख रुपये आहे. ही महत्त्वपूर्ण अटक करून तस्करी करून आणण्यात आलेले आणखी सोने हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

विमानाच्या शौचालयातील टिश्यू पेपरच्या खाली हे सोने लपवण्यात आले होते. पण सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना पक्की खबर असल्यामुळे विमानात शोध मोहिम राबवून सोने हस्तगत करण्यात यश आले आहे.

त्यानंतर सीसीटीव्हीच्या मदतीने संशयीत प्रवाशांची यादी तयार करण्यात आली. त्यातील एकाला विमातळाच्या हॉलमध्येच ताब्यात घेण्यात आले. आरोपीचा आणखी एक साथीदार हे सोने विमानतळाबाहेर काढणार असल्याचा संशय सीमाशुल्क अधिकाऱ्यांना आहे. त्याबाबत तपास सुरू आहे.

यापूर्वीही 28 जानेवारीलाही अशाच प्रकारे 87 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात सीमाशुल्क विभागाला यश आले होते. तसेच गेल्या महिन्यातही विमानच्या आसनाच्या खाली सोने लपवण्यात आले होते. त्यावेळीही 73 लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले होते. पण दोनही वेळी आरोपी मात्र सीमाशुल्क विभागाच्या हाती लागले नाहीत. त्यामुळे ही अटक महत्त्वपूर्ण मानली जातेय. आता अटकेतील इसमाच्या साहाय्याने मोठ्या टोळीपर्यंत पोहोचण्यात अधिकाऱ्यांना यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय. 

mumbai news customs officers busted gold trafficking racket from mumbai airport

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com