मुंबई: डबेवाल्यांची सेवा आज बंद राहणार

पूनम कुलकर्णी
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबईत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि लोकलचे विस्कळीत झालेले टाईम टेबल पाहता मुंबईच्या डबेवाल्यांनी बुधवारी आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : मंगळवारपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाले आहे. वाहतूक सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्याचे चित्र शहरात पहायला मिळत आहे. कशाचीही परवा न करता 12 महिने काम करणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा मात्र नेहमी सुरु असते. परंतु आज (बुधवार) ही सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.

29 ऑगस्ट रोजी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे अनेक मुंबईकर अडकले होते. त्याच प्रकाराची पुनरावृत्ती पुन्हा एकदा मुंबई शहरात पाहायला मिळत आहे.

मुंबईत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि लोकलचे विस्कळीत झालेले टाईम टेबल पाहता मुंबईच्या डबेवाल्यांनी बुधवारी आपली सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतुकीच्या समस्येमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता ही सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल तरी मुंबईकरांनी याची दखल घ्यावी, असे मुंबई डबेवाला असोशिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी सांगितले.

Web Title: Mumbai news dabbawala service closed today due to rain

टॅग्स