
मुंबई: डोंबिवलीतील वैभव हरिहरन हा 22 वर्षीय तरुण सीएच्या परीक्षेत देशात दुसरा आला आहे. 800 पैकी 601 गुण मिळवून वैभवने बाजी मारली आहे. दहा मार्कांसाठी वैभवचा पहिला नंबर हुकला असला तरी देशातून दुसरा आलो आहे ही बाबही खूप सुखावणारी असल्याची भावना वैभव आणि त्याच्या आई वडिलांनी सकाळकडे व्यक्त केली. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडियातर्फे जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फायनल परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. सोमवारी आयसीएआयच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर झाला.
डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात राहणारा वैभव या परीक्षेत भारतातून दुसरा आला आहे. आपण सीएच्या परीक्षेत पास होणार याची खात्री होती. पण पहिले येऊ याची खात्री होती. पण दुसरे येऊ याची खात्री नव्हती असे वैभवने सकाळशी बोलताना सांगितले. डोंबिवलीतील राज शेठ हा डोंबिवलीकर 2017 साली सीए परीक्षेत देशातून पहिला आला होता. त्याचाच आदर्श ठेवून मी परीक्षेत यश मिळविण्याच्या दृष्टीने अभ्यास करत होतो, असंही वैभव म्हणाला.
वैभवचे वडील ए. हरीहरन हे बॅंक ऑफ बडोदामध्ये नोकरी करतात. तर आई महिला समिती शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात.
जाणून घ्या वैभवचा शैक्षणिक प्रवास
वैभव हा पहिल्यापासूनच शाळेत हुशार होता. हॉली एंजल्स स्कूलमधून सीबीएसई बोर्डात दहावी परीक्षेत त्याला 99.60 टक्के गुण मिळाले होते. महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्याने आर.ए.पोद्दार महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. बारावीला त्याने 96 टक्के गुण पटकाविले तर पदवी परीक्षेत 90 टक्के गुण प्राप्त करत तो मुंबई युनिव्हर्सिटीतून पहिला आला होता. महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता वैभव सीएचा अभ्यास देखील करीत होता.
2017 सालापासून तो ईवाय कंपनीत इंटर्नशीप करीत होता. जुलै 2020 मध्ये इंटर्नशीप संपल्यानंतर त्याचे काम पाहून कंपनीने त्याला रेग्युलर वर्कर म्हणून रुजू करुन घेतले. लॉकडाऊनमध्ये घरातून काम करत असताना 2019 पासून तो सीए फायनल परीक्षेसाठी अभ्यास करत होता. सुरुवातीला 8 ते 10 तास अभ्यास करत होतो, नंतर 12 ते 14 तास अभ्यास करायला लागलो आणि शेवटच्या एक दिड महिन्यात 15 ते 18 तास अभ्यास केल्याचे तो सांगतो. डिसेंबर 2020 पासून स्टडीसाठी सुट्टी घेतली होती. लॉकडाऊन काळात सतत परीक्षा पुढे ढकलल्या जात होत्या. तीन वेळा परीक्षा पुढे ढकलली गेल्याने नोव्हेंबरमध्ये झालेल्या परीक्षेसाठी माझी मानसिक तयारी झाली नव्हती. त्यामुळे जानेवारी 2021 मध्ये झालेली परीक्षा दिली, असं वैभवनं सांगितलं आहे.
दहावीत असतानाच सीए होणार असे ठरविले होते. त्यादृष्टीनेच महाविद्यालयीन शिक्षण आणि सीएचा अभ्यास सुरु केला होता. पुढे फायनान्शिअल मॅनेजमेंटमध्ये करिअर करावयाचे असल्याचे वैभवने सांगितले. मुलगा देशातून दुसरा आला तसेच शैक्षणिक क्षेत्रात डोंबिवलीचे नाव त्याने देशात उंचावले याचा आम्हाला आनंद आहे. आमचा आनंद टॉप लेव्हलला असून तो शब्दात सांगता येणार नाही असे वैभवच्या आई वडिलांनी सांगितले. वैभवने प्राप्त केलेल्या यशामुळे त्याचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.
-----------------------------------------------
(संपादन- पूजा विचारे)
Mumbai News Dombivali Vaibhav Hariharan came second CA exam in India
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.