Mumbai News : डोंबिवली रेल्वे स्थानकाच रुप पालटणार

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक आहे.
dombivali
dombivali sakal

डोंबिवली - पुढील स्टेशन डोंबिवली...लोकलमधून पाय टाकताच मुंगीलाही शिरायला जागा उरणार नाही अशी गर्दी...उकाड्याने हैराण प्रवासी...कोठे डोक्यावर छप्परच नाही...शौचालयाची सुविधा नाही अशा अनेक समस्यांचा सामना डोंबिवलीकर करत आहे.

मात्र लवकरच डोंबिवली रेल्वे प्रवाशांची यातून सुटका होणार असून पंचतारांकीत सुविधा प्रवाशांना प्राप्त होणार आहेत. अंदाजित 120 कोटी रुपये खर्च करुन रेल्वे प्रशासन डोंबिवली रेल्वे स्थानकाचा कायापालट करणार आहे. ऑक्टोबर महिन्यात या कामास सुरुवात होणार असून लवकरच एक सुसज्ज व प्रशस्त असे रेल्वे स्थानक डोंबिवलीकरांना पहायला मिळेल.

मध्य रेल्वे मार्गावरील सर्वाधिक वर्दळीचे स्थानक म्हणून डोंबिवली रेल्वे स्थानक आहे. या स्थानकातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असून रेल्वे प्रशासनास उत्पन्न देखील या स्थानकातून जास्त मिळते. मात्र तरीही अनेक सोयी सुविधांपासून आजही डोंबिवलीकर रेल्वे प्रवासी वंचित आहेत. स्थानकातील अनेक पंखे हे नादुरुस्त झाले आहेत.

dombivali
Solapur: शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता बंद

जे चालतात त्यांची हवाच लागत नाही. सरकते जिने किंवा अन्य कामामुळे काही ठिकाणी प्रवाशांच्या डोक्यावर छप्पर नाही. शौचालयांना कुलूप असल्याने त्याची सुविधा नाही. पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा नाही. प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने फलाटावर किड्या मुंगीसारखी गर्दी सकाळ संध्याकाळ पिक अव्हरर्स मध्ये पहायला मिळते. परंतू आता या समस्यांचा निपटारा लवकरच होणार आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकाचा दुसऱ्यांदा चेहरामोहरा बदलण्याचे काम रेल्वे प्रशासनाने हाती घेतली आहे.

मुंबई रेल्वे विकास मंडळाच्या माध्यमातून टप्पा तीन ए अंतर्गत हे काम हाती घेण्यात येणार आहे. रेल्वे मंडळाने मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण 17 रेल्वे स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये डोंबिवली, मुलुंड रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.

या दोन्ही स्थानकांच्या विकासासाठी 120 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. या कामाची निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असून डोंबिवली स्थानकाचे काम ऑक्टोबर महिन्यात सुरु होईल. 11 कोटी खर्च करुन इलेक्ट्रिक कामे, सिग्नल अॅण्ड टेलिकम्युनिकेशन सेवा सुधारण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

dombivali
Nanded News : दाजीची भाऊजीला धोबीपछाड,दहा जागा जिंकून बाजार समितीवर कब्जा

काही वर्षांपूर्वी डोंबिवली रेल्वे स्थानकातील रेल्वे तिकीट खिडकी, जिन्यांची जूनी रचना बदलून नव्या रचनेत रेल्वे स्थानकाची बांधणी करण्यात आली आहे. आता वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करुन रेल्वेने पुढील तीन वर्षाच्या कालावधीत डोंबिवली स्थानकात 12 मीटरचे दोन मोठे पूल, 15 मीटरची एसपेस जागा, पश्चिमेकडील फलाट 1 वरील रेल्वे कार्यालयाचे नूतनीकरण, त्यामध्ये अद्यावत शासकीय कार्यालये, तिकीट घर, प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, व्हिजिटींग रुम, पार्कींग झोन, रिझर्व्हेशन दालन यासोबत स्थानकाची शोभा वाढेल या पद्धतीने सजावट करत प्रवाशांना अत्याधुनिक अशा पंचतारांकीत सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

dombivali
Nagpur News : कधी लागणार हो एसटी फलाटावर?

यामुळे येत्या काळात डोंबिवलीकरांना सोयी सुविधांनी सुसज्ज असे पंचतारांकीत रेल्वे स्थानकातून प्रवास करता येणार आहे. आजच्या घडीला लाखो चाकरमानी या स्थानकातून प्रवास करत असून भविष्यात ही संख्या वाढणार आहे. रेल्वे स्थानकाचा विकास होत असतानाच पालिका प्रशासनाने देखील शहरात त्याप्रमाणे सोयी सुविधा देऊन डोंबिवलीकरांना दिलासा द्यावा अशी मागणी प्रवासी करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com