esakal | वर्षभरापासून रखडलेली परीक्षा आता होणार ऑनलाईन, कोरोनामुळे मुंबई विद्यापीठाची पेट परीक्षा मार्चमध्ये 

बोलून बातमी शोधा

वर्षभरापासून रखडलेली परीक्षा आता होणार ऑनलाईन, कोरोनामुळे मुंबई विद्यापीठाची पेट परीक्षा मार्चमध्ये }

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबई विद्यापीठाकडून पेट परीक्षा ही 23 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती

वर्षभरापासून रखडलेली परीक्षा आता होणार ऑनलाईन, कोरोनामुळे मुंबई विद्यापीठाची पेट परीक्षा मार्चमध्ये 
sakal_logo
By
संजीव भागवत

मुंबई : कोरोना आणि त्याच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षभरापासून मुंबई विद्यापीठाकडून आयोजित करण्यात येणारी पीएचडी प्रवेश परीक्षा अर्थात पेट ही परीक्षा मागील वर्षभरापासून रखडली आहे. तब्बल तीन वेळा या परीक्षेसाठी नियोजन करून ही विद्यापीठालाही परीक्षा घेता आली नाही. मात्र आता ती मार्च महिन्यात ऑनलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. यासाठी मंगळवारी 2 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.

 संजय राठोड यांची झाडाझडती, राजीनामा देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ?

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबई विद्यापीठाकडून पेट परीक्षा ही 23 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्याचे समोर आल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. त्यामुळे आता ही परीक्षा मार्च महिन्यात अखेरच्या आठवड्यात घेण्याचे नियोजन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे. त्यासाठी लवकरच तारीख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे पीएचडी सोबतच एमफीलच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या प्रवेश परिक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास 2 मार्च  पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

महत्त्वाची बातमी : मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आज मुंबईत 'मोठी' बैठक

मुंबई विद्यापीठाने गेल्या वर्षी 27 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 दरम्यान पेट परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागवले होते. त्यास तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. आतापर्यंत विद्यापीठाकडे पेट परीक्षेसाठी 10 हजार 64 इतके अर्ज प्राप्त झाले असून यामध्ये पीएचडी साठी 9 हजार 675 तर एमफील साठी 389 एवढे अर्ज प्राप्त झाले असून पुढील दोन दिवसात यात आणखी भर पडणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी दिली.

mumbai news education university of mumbai phd pet exams will be conducted online