Mumbai News: डोंबिवलीतील इमारतीला भीषण आग; पाच ते सहा मजले जळून खाक

डोंबिवली येथील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. खोणी पलावा येथील आलोरिया या इमारतीत भीषण आग लागली. आगीत पाच ते सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक झाल्या आहेत.
Mumbai Dombivli News
Mumbai Dombivli News
Updated on

मुंबई- डोंबिवली येथील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. खोणी पलावा येथील आलोरिया या इमारतीत भीषण आग लागली. आगीत पाच ते सहा मजल्याच्या गॅलरी जळून खाक झाल्या आहेत. फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Mumbai News Fire breaks out at multi storey building in Dombivli)

सातव्या मजल्यावर आग लागली होती. त्यानंतर ती इतर मजल्यांवर पसरत गेली. सुदैवाने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंतच लोक राहत होते. आग लागल्याचे समजल्यानंतर सर्व रहिवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. आगीच्या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जाते. व्हिडिओमध्ये आगीचं भीषण रुप दिसून येत आहे. घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. जीवितहानीची कोणतीही माहिती नाही.

Mumbai Dombivli News
Beed Accident News : बीडच्या मांजरसुंबा-पाटोदा महामार्गावर भीषण अपघात! पाच जण जागीच ठार

खोणी पलावा येथील आलोरिया या इमारतीत शनिवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागली होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार इमारतीच्या एका मजल्यावरील घर मालक वॉशिंग मशीन बंद करण्यास विसरून गेल्याने तिच्यातील कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. आगीची माहिती मिळताच केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी भेट देत आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. सुदैवाने या आगीत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नसून इमारतीचे मात्र मोठे नुकसान झाले आहे.

Mumbai Dombivli News
वर्षभराची मेहनत वाया! मंडणगडमध्ये आंबा, काजूची 350 झाडे जळून खाक; आग कोणी लावली? पोलिस तपास सुरू

खोणी तळोजा महामार्गावर असलेल्या पलावा सिटी मध्ये इमारतीच्या अकराव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. ही आग थेट इमारतीच्या शेवटच्या मजल्यापर्यंत आली होती. या आगीत इमारतीच्या एका बाजूला असलेल्या प्लॅस्टिकच्या जाळ्या आगीच्या भक्षस्थानी गेल्या. प्लॅस्टिकने पेट घेतल्याने परिसरात प्रचंड धुराचे लोळ पसरले होते.

खोणी पलावा मधील आलोरिया या इमारतीत कबुतर जाऊ नयेत म्हणून प्लॅस्टिकच्या जाळ्या बसविण्यात आल्या होत्या. या जाळीला वॉशिंग मशीनच्या कॉम्प्रेसरच्या आगीचा प्लास्टिकला स्पर्श झाल्याने आग भडकली आणि आगीने रौद्र रूप धारण केलं होते. केडीएमसीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीचे मुख्य कारण हे शोधले जात आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com