वर्षभराची मेहनत वाया! मंडणगडमध्ये आंबा, काजूची 350 झाडे जळून खाक; आग कोणी लावली? पोलिस तपास सुरू

पन्हळी बुद्रुक येथे खासगी मालकीच्या जागेत आग लागल्याने आंबा (Mango Trees) व काजूची ३५० झाडे जळून खाक झाली.
Mango Trees Mandangad Bankot Police
Mango Trees Mandangad Bankot Policeesakal
Summary

आंबा-काजू मोहोर येण्याच्या काळातच या आगीत झाडे जळून होरपळून गेल्याने यावर्षी यातून मिळणाऱ्या उत्पन्नास मुकावे लागणार आहे.

मंडणगड : पन्हळी बुद्रुक येथे खासगी मालकीच्या जागेत आग लागल्याने आंबा (Mango Trees) व काजूची ३५० झाडे जळून खाक झाली. यात मालकांचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात मालक सुरेश विश्राम बोथरे (वय ६४, रा. पन्हळी बुद्रुक) यांनी बाणकोट पोलिसात (Bankot Police) या घटनेसंदर्भात माहिती दिली असून, त्यांचा जवाब नोंदवून पुढील कार्यवाही पोलिसांच्यावतीने सुरू आहे.

बोथरे हे सेवानिवृत्तीनंतर गावी व मुंबईला येऊन जाऊन राहतात. गावात केतकवणेचा खोडा येथे त्यांची आंब्याची व काजूची झाडांची बाग आहे. २९ डिसेंबर २०२३ ला गावातील शेतकरी पांडुरंग दुर्गवले सकाळी ८ वा. गुरे चरवण्यासाठी गेले असताना बोथरे यांना फोन करून त्यांच्या जागेत आग लागलेली असल्याची माहिती दिली.

Mango Trees Mandangad Bankot Police
कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या आईच्या चारही मालमत्तेचा होणार लिलाव; 'या' गावात उद्या लागणार बोली

बोथरे हे गावातील दोघांसमवेत जागेत गेले असता लागलेली आग विझत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संपूर्ण जागेची पाहणी केली असता जागेत ३५० आंबा व काजूची झाडे जळून खाक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी पोलिसपाटील चिंचघर व ग्रामस्थांना याची माहिती दिली. उशिराने पोलिसात या विषयी माहिती दिली. जागेत आग कोणी लावली, याचा तपास कऱण्याची विनंती बोथरे यांनी केली.

Mango Trees Mandangad Bankot Police
Mumbai-Goa Highway : मुंबईहून कोकणात देवदर्शनासाठी निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात; 10 भाविक गंभीररित्या जखमी

वर्षभराची मेहनत वाया

आंबा-काजू मोहोर येण्याच्या काळातच या आगीत झाडे जळून होरपळून गेल्याने यावर्षी यातून मिळणाऱ्या उत्पन्नास मुकावे लागणार आहे. त्यामुळे वर्षभर घेतलेली मेहनत वाया गेली आहे. जंगलात ही आग नेमकी पेटते तरी कशी, हा प्रश्न बोथरे यांच्यासमोर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com