Flower Market
sakal
मुंबई
Mumbai News: ऐन दिवाळीत व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना आर्थिक फटका! कृत्रिम फुलांची मागणी वाढली, खऱ्या फुलांच्या दरात घट
Dadar Flower Market: दिवाळीनिमित्त कृत्रिम फुलांना मागणी वाढली आहे. यामुळे फुलबाजारातील व्यापारी आणि शेतकऱ्यांना फटका बसत आहे.
नितीन बिनेकर
मुंबई : दिवाळीच्या तोंडावर दादर फुलबाजारात नेहमीच पहाटेपासून गजबज असते. टोपल्यांतून ठेवलेल्या झेंडू, शेवंती, मोगऱ्याचा दरवळ संपूर्ण बाजारभर पसरलेला असतो; पण यंदा ते दृश्य काहीसे फिके पडले आहे. बाजारातील गर्दीला नेहमीसारखा उत्साह नाही. कारण कृत्रिम फुलांना मागणी वाढली असून रंगीबेरंगी प्लास्टिक आणि सॅटिनच्या फुलांच्या माळांनी बाजारातील खऱ्या फुलांची मागणी कमी केली आहे. पारंपरिक फुलबाजारातील व्यापारी आणि पर्यायाने शेतकऱ्यांना या कृत्रिम फुलांच्या वाढत्या विक्रीमुळे मोठा फटका बसला आहे.
