गुन्हेगारांच्या पाहाखालची वाळू सरकली; मुंबई पोलिसांचं गेल्या तीन महिन्यातील चौथं ऑपरेशन ऑलआऊट

गुन्हेगारांच्या पाहाखालची वाळू सरकली; मुंबई पोलिसांचं गेल्या तीन महिन्यातील चौथं ऑपरेशन ऑलआऊट

मुंबई, ता.14ः गंभीर गुन्ह्यांना रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शनिवारी शहरात ऑपरेशन ऑल आऊट राबवले असून त्यात मुंबई पोलिसांचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते या कारवाईत 1278 सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच 599 आरोपी सापडले आहेत. तसेच अंमली पदार्थ विरोधी कायद्या अंतर्गत 88 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. गेल्या तीन महिन्यातील मुंबई पोलिसांची ही चौथी मोहीम आहे.

गुन्हेगार आणि बेकायदेशीर कारवायांविरोधात सक्रिय मोहिम राबविण्यासाठी मुंबई पोलिसांनी 13 फेब्रुवारीच्या मध्यरात्री सर्वत्र ऑल आऊट ऑपरेशन केले. सह पोलिस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था)  विश्वास नांगरे पाटील व इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वात सर्व मुंबई पोलिस ठाण्यात ही कारवाई पार पाडली. सर्व 5 प्रादेशिक विभागांचे अतिरिक्त पोलिस आयुक्त, सर्व 13 परिमंडळ विभागांचे पोलिस उपायुक्त, सर्व विभागांचे सहाय्यक पोलिस आयुक्त, सर्व पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात उपस्थित राहिले आणि त्यांनी ऑपरेशनचे वैयक्तिक निरीक्षण केले.

प्रत्येक पोलिस ठाण्यांमधुन जास्तीत जास्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. प्रत्येक कार्य करण्यासाठी समर्पित वैयक्तिक टिमसह अभिलेखावरील गुन्हेगारांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती व क्रियांसाठी हॉटेल्स, लॉजेस आणि मुसाफिरखानांची तपासणी, संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू जसे की शस्त्रे, ड्रग्स, इ. म्हणून वापरल्या जाणाऱ्या वस्तू, शोधण्यासाठी नाकाबंदीचे व कोम्बिंग ऑपेरशनचे आयोजन, फरार आणि पाहिजे व्यक्तींना अटक करणे, प्रलंबित अजामीनपात्र वॉरंट आणि स्थायी वॉरंटची बजावणी, अवैध दारू, जुगार अशा बेकायदेशीर कामांवर कारवाई, पोलिस दृश्यमानता वाढविण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि संवेदनशील भागात पायी गस्त ही कामे या ऑपरेशन अंतर्गत हाती घेण्यात आली होती.

ऑलआउटमध्ये पुढील कारवाई करण्यात आली

  • शहरात एकुण 259 ठिकाणे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले , त्यामध्ये भिलेखावरील 1278 आरोपी तपासण्यात आले . त्यामध्ये 599 आरोपी मिळून आले असून,39 पाहिजे व फरारी आरोपींना अटक करण्यात आली.ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान दत्तक आरोपी योजनेअन्वये 1561 आरोपी तपासण्यात आले.
  • एकुण 88 इसमांवर अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.
  • अवैध शस्त्रे बाळगणा-या एकुण 37 जणांवर कारवाई करून शस्त्रे जप्त करण्यात आली.
  • सर्व पोलिस ठाण्यांचे हददीत एकुण 149 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली होती. 1. त्यामध्ये एकुण 11 हजार 881 दुचाकी/चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली.  2. मोटारवाहन कायदयान्वये तीन हजार 141 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. 3. कलम 185 मो.वा.का. अन्वये 31 वाहनचालकांवर ड्रंक अॅन्ड ड्राइव्ह ची कारवाई करण्यात आली.
  • बेकायदेशीर वास्तव्य करणा-यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने एकुण 951 हॉटेल, लॉजेस, मुसाफिरखाने यांची तपासणी करण्यात आली.
  • अवैध धंद्यांवर 42 ठिकाणी छापे टाकून, अवैध धंदे समूळ उध्वस्त करण्यात आले. त्यामध्ये 71 आरोपींवर कारवाई करण्यात आली.
  • प्रतिबंधात्मक कारवाईचे अनुषंगाने मर्मस्थळे व संवेदनशिल ठिकाणे एकुण 505 तपासणी करण्यात आले.
  • तडिपार केलेल्या 37 आरोपींवर मपोका कलम 142 अन्वये कारवाई करण्यात आली.
  • महाराष्ट्र (मुंबई ) पोलिस कायदयाचे कलम कलम 120 व 122 अन्वये एकुण 90
  • इसमांवर कारवाई करण्यात आली असून अनधिकृत 135 फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली.
  • ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान 50 भिक्षेकरींवर कारवाई करण्यात आली.
  • अजामीनपात्र वॉरंटमधील एकुण 176 आरोपी अटक करण्यात आली.

mumbai news forth operation in last three months mumbai police operation all out starts

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com