esakal | लोकलमधील सूचना फक्त हिंदी आणि इंग्रजीत; मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये मराठीला डावलले 

बोलून बातमी शोधा

लोकलमधील सूचना फक्त हिंदी आणि इंग्रजीत; मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये मराठीला डावलले }

गाडी थांबविण्यासाठी अलार्म सेवा प्रवाशांसाठी प्रदान केली आहे. मात्र या अलार्म सेवेची माहिती हिंदी, इंग्रजी आणि ब्रेल लिपीत देण्यात आली आहे

लोकलमधील सूचना फक्त हिंदी आणि इंग्रजीत; मध्य रेल्वेच्या लोकलमध्ये मराठीला डावलले 
sakal_logo
By
कुलदीप घायवट

मुंबई, ता. 5 : मध्य रेल्वे प्रशासनाकडून वारंवार मराठी भाषेला डावलण्यात येत आहे. लोकलमध्ये अत्यावश्यक असलेल्या सूचनाफलक फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर केला जात आहे. मध्य रेल्वे प्रशासनाला त्रिभाषा सूत्री नियमांचा विसर झाल्याचे दिसून येत आहे. याबद्दल मराठी एकीकरण समितीच्यावतीने तक्रार करण्यात आली आहे. 

राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयात इंग्रजी व हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेचा वापर करण्याचा नियम आहे. त्रिभाषा सूत्रानुसार व महाराष्ट्र राजभाषा अधिनियमांतर्गत मध्य रेल्वे प्रशासनाने काम करणे आवश्यक आहे. मात्र प्रशासनाकडून सातत्याने मराठी भाषेला डावलले जाते. 

राज्यात मराठी भाषा संवर्धन काम करत असताना मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी रेल्वे प्रशासन, स्थानिक जिल्हाधिकारी यांना अनेकदा पत्र पाठविण्यात आली आहेत. तरीही रेल्वे प्रशासनात संपूर्णरित्या मराठी भाषेचा वापर केला जात नाही, असे मराठी एकीकरण समितीच्या वतीने सांगण्यात आले. 

महत्त्वाची बातमी :  मनसुख हिरेन मृत्यूनंतर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया 

महाराष्ट्रात धावणाऱ्या लोकलमधील सूचना फलकावर महाराष्ट्राची राजभाषा मराठी हद्दपार करण्यात आली आहे.ते ही महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य देणे अनिवार्य असताना मराठी भाषेची गळचेपी केली जाते. अनेक वेळा तक्रारी करून देखील बदलत करण्यास दिरंगाई केली जाते. पंतप्रधान तक्रार निवारण मंच यावर तक्रार दाखल करण्यात आली होती. यावरून असे सांगण्यात आले की, 117 लोकलवर त्रिभाषा सूत्री नियमांचे पालन केले आहे. मात्र आयसीएफ कोचमधून 38 नवीन आलेल्या लोकलमध्ये मराठी भाषेतील  सूचना लावण्यात येणार आहेत, असे मराठी एकीकरण समितीचे  सागर नार्वेकर यांनी सांगितले. 

इथे मराठी हवीच 

गाडी थांबविण्यासाठी अलार्म सेवा प्रवाशांसाठी प्रदान केली आहे. मात्र या अलार्म सेवेची माहिती हिंदी, इंग्रजी आणि ब्रेल लिपीत देण्यात आली आहे. याठिकाणी मराठी भाषेला स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे या सूचना फलकाच्यावर ‘इथे मराठी हवीच’ असा चिटक्या (स्ट्रिकर) लावण्यात आला आहे.

दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासन नियमांचे पालन करत आहे, अशी प्रतिक्रिया मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिली.
 

mumbai news information shared in local train are only in hindi and english