मनसुख हिरेन मृत्यूनंतर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया 

अनिश पाटील
Friday, 5 March 2021

मी सर्वात पहिल्यांदा घटनास्थळी पोहोचलो नाही - सचिन वाझे

मुंबई : अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणवीस यांनी केलेल्या आरोपानंतर आपण अंबानी यांच्या घराजवळ असलेल्या कारमध्ये सर्वप्रथम पोहोचलो नसल्याचे प्रसिद्धी माध्यमांना सांगितले. सर्वात प्रथम गावदेवी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक घटनास्थळी पोहोचले, त्यानंतर ट्राफीकचे अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर स्थानिक उपायुक्त घटनास्थळी पोहोचले होते, त्यानंतर बीबीडीएस व त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक पोहोचले होते. त्यात मी असल्याचे वाझे यांनी सांगितले.

याशिवाय आपली मानसिक स्थिती ठीक नसून पत्रकार आणि पोलिस आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार मनसुख हिरेन यांनी मुंबई पोलिस आयुक्त आणि ठाणे पोलिस आयुक्तांकडे  केली असल्याचे आपल्याला समजले, असल्याचेही वाझे यांनी यावेळी म्हटले.

पत्रकाराने त्यांना रात्री उशीरा दूरध्वनी करून पोलिस तुमच्याकडे संशयीत म्हणून पाहत आहे, असे विचारले होते, अशी पण माहिती आहे. सीडीआरबद्दल विचारले असता वाझे यांनी त्याबद्दल आपल्याला माहिती नसून फडणवीस साहेबांनाच विचारा असे त्यांनी सांगितले. तसेच हिरेन यांच्या संपर्कात होते का याबाबत वाझे यांनी त्यांचे ठाण्यात दुकान आहे, माझ्या बाबतच्या आरोपांबद्दल मला काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले

महत्त्वाची बातमी : अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा, दिला महत्त्वपूर्ण निर्णय

कोण आहेत सचिन वाझे? 

1990 मध्ये सेवेत दाखल झालेल्या वाझे यांनी 63 गुंडांना यमसदनी धाडले होते. त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात उपनिरीक्षक पदापासून झाली. गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त परिसरातून सेवेची सुरूवात करणाऱ्या वाझे ठाणे पोलिस दलात आपल्या कामामुळे प्रसिद्धीला आले.

2002 घाटकोपर स्फोटीतील संशयीत आरोपी ख्वाजा युनुस कोठडीतील संशयीत मृत्यूप्रकरणात त्यांना निलंबीत करण्यात आले होते. त्यानंतर 2008 मध्ये त्यांनी शिवसेना पक्षातही प्रवेश केला होता.

ख्वाजा युनुस प्रकरणी वाझे यांच्यासह आणखी काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. पुढे न्यायालयीन प्रक्रियाही चालली.

महत्त्वाची बातमी :  अँटिलीया स्फोटके प्रकरण : स्कॉर्पियो कार मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह आढळला खाडीत

वाझे यांच्यासर इतर विविध प्रकरणांमध्ये निलंबीत 18 पोलिसांना सेवेत सामावून घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेच्या गुप्तवार्ता विभागाच्या प्रभारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलीबाग पोलिसांनी अटक केली होती. नोव्हेंबर 2020 मध्ये ही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी सचिन वाझे यांच्या पथकाने अर्णब गोस्वामी यांना घरातून उचललं होते.

mansukh hiren found dead in the creek first reaction of crime branch officer sachin vaze


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mansukh hiren found dead in the creek first reaction of crime branch officer sachin vaze