रेल्वेबाबत खास आकर्षणाचा विषय असणाऱ्या 'त्या' विभागात आहे नोकरीची संधी, 77 स्थानकांवर भरणार जागा

रेल्वेबाबत खास आकर्षणाचा विषय असणाऱ्या 'त्या' विभागात आहे नोकरीची संधी, 77 स्थानकांवर भरणार जागा

मुंबई, ता. 8 : मध्य रेल्वे मार्गावर 'प्रवाशांनो, कृपया लक्ष द्या' अशी उद्घोषणा करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील एकूण 77 स्थानकावर दोन वर्षांसाठी उद्घोषक आणि इंडिकेटर दर्शक दाखविण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून यासंदर्भात निविदा काढली आहे. त्यामुळे बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

भारतीय रेल्वेमध्ये खासगीकरण सुरू आहे. त्यामुळे खासगी तत्वावर, कंत्राटी पद्धतीने कामगार रुजू केले जातात. २०१६ पासून मध्य रेल्वेने खासगी उद्घोषकांची नेमणूक करण्याची सुरुवात केली. यासाठी दोन वर्षांच्या करारावर खासगी कंपनीला कंत्राट देण्यात येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हार्बर मार्गावरील डॉकयार्ड रोड ते चुनाभट्टी, किंग्ज सर्कल, टिळक नगर ते खांडेश्वर; ट्रान्स हार्बर मार्गावरील ऐरोली ते तुर्भे अशा 26 स्थानकावर वर्षांसाठी 6 कोटी 38 लाख 44 हजार 700 रुपयांचे कंत्राट निघाले आहे. या 26 स्थानकावर काम करण्याची बेरोजगारांना संधी मिळाली आहे.  उद्घोषक आणि इंडिकेटर  दर्शक म्हणून काम येथे मिळणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील कळवा ते खोपोली, शहाड ते कसारा, खंडाळा, लोणावळा, इगतपुरी आणि रोहा अशा  30 स्थानकावर 5 कोटी 91 लाख 19 हजार 302 रुपयांचे कंत्राट निघाले आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते ठाणे, पनवेल आणि  लांब पल्ल्याच्या थांबा घेणाऱ्या सीएसएमटी, एलटीटी, पनवेल अशा 21 स्थानके आणि 23 ठिकाणी  उद्घोषक आणि इंडिकेटर दर्शक यांचे कंत्राट निघाले आहे. हे कंत्राट 5 कोटी 65 लाख 71 हजार 253 रुपयांचे आहे. हे काम दोन वर्षे कंत्राटी पध्दतीने देण्यात आले आहे.

mumbai news job vacancy for the announcement and showing indicators in central railways

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com