सकाळ - मधुरांगण च्या मनोरंजनाने भारावल्या सैनिक पत्नी आणि मुले

madhurangan
madhurangan

मुंबई - वर्षभर आपले कुटुंबिय आणि देशासाठी लढणाऱ्या आपल्या पती राजांची आणि कुटुंबियांची सक्षम पणे सांभाळ करणाऱ्या त्या पत्नी रूपी आदिशक्तिचा गौरव करण्यासाठी त्यानाही थोडा विरंगुळा मिळावा आणि मनोरंजना बरोबरच 'ती' चे ही अन्य सैनिक पत्नी समवेत गेट टुगेदर व्हावे या उदात्त हेतुने आर्मी वाईफ वेल्फेयर असोसिएशन (awwa)यांच्या तर्फे क्लोजिंग डे निमित्त कुलाबा येथे सांस्कृतिक कार्यक्रम साजरा करण्यात आला.

'अव्वा' तर्फे ख़ास सकाळ माध्यमाच्या 'मधुरांगण'ला सांस्कृतिक कार्यक्रम करण्यास आमंत्रित करण्यात आले होते.त्याला कारणही तसेच होते. सकाळ माध्यमाची जनमानसात असलेली विश्वसनीयता आणि लोकप्रियता यांचा प्रभाव असल्याने सकाळ माध्यमाला आमंत्रित केले होते. तसे पाहता आर्मी आपल्या कार्यक्रमांना प्रसिद्धि माध्यमाना शक्यतो दुरच ठेवते पण त्यास अपवाद  झालाय तो सकाळ माध्यम - मधुरांगणाचा. टीम 'मधुरांगण'ने आषाढ़ी दिंडी सोहळा करताच  सभागृहातील सैनिक पत्नी आणि बच्चे कंपनीने जणु काही आपणही यात सहभागी आहोत, अशा श्रद्धेने पांडुरंगाला वंदन केले.

मधुरांगण टिमने महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातुन सुरुवात करताना महाराष्ट्राचा ग्रामीण भाग, द्वार तुलसी पूजन,वासुदेवाचे प्रकटने, नित्यकर्मे शेती नांगरट,कोळी नृत्य,लावणी, झिम्मा - फुगड़ी, नृत्य,सासु सुनेची जुगलबंदी, फुगड़ी, गणेशोत्सवातील गीत नृत्ये सादर केली. कलाकारांचा नृत्याविष्कार आणि  अभिनयाने कार्यक्रमास रंगत आली. त्यात रंगुन सैनिक पत्नी मंत्रमुग्ध झाल्या.

भारतीय नागरिकांचा घास अडतो ओठी, सैनिक हो तुमच्या साठी... या गिताने आणि त्यातील कलाकारांच्या कारुण्यमय अभिनयाने  युद्धस्थ परिस्थितीत पती - बाबा हे कर्तव्यावर असताना आपल्या जीवाची होणारी घालमेल प्रत्यक्ष अनुभवलेल्या सैनिक पत्नी आणि मुलांच्या डोळ्यांच्या कड़ा ओलावल्या.तर काहींच्या नयनांतून अश्रु वाहिले.

जेव्हा हाती तिरंगा घेत नृत्य सादर झाले त्या वेळी भारत मातेच्या या वीर कन्यांना पाहुन सभागृहात उपस्थितात एक नव चैतन्य आले.आणि मुखांतुन भारत माताकी जय असा जय घोष दुमदुमला टाळ्यांचा कड़कडाट झाला.  विविध विषयांतील शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त केलेल्या सैनिकांच्या मुला मुलींचा स्मृती चिन्ह देत गुणगौरव करण्यात आला. 

तत्पूर्वी सकाळी सव्वा दहा वाजता कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या शुभहस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आली. अर्चिता भट्टाचार्य यांनी त्यांच्या टीमसह देशभक्तिपर स्फुरण गीते गात कार्यक्रमाला सुरुवात केली. 'अव्वा' च्या पदाधिका-यांनी अर्चितासह सकाळ माध्यमाचे आणि मधुरांगणचे खास कौतुक केले.आर्मी वाईफ वेल्फेयर असोसिएशन सह हेल्थ ऑर्गनाइजेशन ने आयोजित केलेल्या या सांस्कृतिक कार्यक्रमास आर्मी ऑफिसर्स आणि त्यांच्या पत्नींचे मार्गदर्शन लाभले. हेल्थ इंस्पेक्टर यांनी विशेष परिश्रम घेतले.

सैनिक पत्नी समोर मधुरांगणने सादर केलेल्या सांस्कृतिक मनोरंजन कार्यक्रमाने आम्हाला आनंद वाटला.सैनिकां प्रती असलेले प्रेम या तुन वृद्धिंगत झाले.यशस्वी विद्यार्थ्यानी चांगला अभ्यास करीत यशाचा आलेख चढ़ता ठेवावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com