Mumbai News : महारेराचा दणका! ११ विकासकांकडून केली साडेआठ कोटींची वसुली

Mumbai News
Mumbai News

मुंबई - मुंबई आणि उपनगरातील ११ विकासकांकडून महारेराने वसुलीपोटी तब्बल ८ कोटी ५७ लाख २६ हजार इतकी रक्कम वसूल केली आहे. महारेराने ग्राहकांना नुकसान भरपाईपोटी जारी केलेले वारंटस वसूल व्हावे, यासाठी महारेरा सातत्याने संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संपर्कात आहे.

Mumbai News
Farmer : शेतकऱ्यांना सुवर्णसंधी! शेततळ्यासाठी आता ७५ हजार रुपये अनुदान

महारेराच्या पाठपुराव्यामुळे अनेक ठिकाणी संबंधित विकासकांच्या मिळकती जप्त करून लिलावाच्या प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत. लवकरच राज्यात आणखी काही ठिकाणी असे लिलाव होणार आहेत. परिणामी आपली मिळकत जप्त होऊ नये यासाठी आता काही ठिकाणी विकासक पुढे येऊन या नुकसान भरपाईच्या रकमा भरत आहेत किंवा संबंधित ग्राहकांशी तडजोड करून नुकसान भरपाईचा प्रश्न निकाली काढत आहेत.

या पद्धतीने २० वारंटसपोटी मुंबई उपनगर, मुंबई शहर , रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील ११ विकासकांनी ८ कोटी ५७ लाख २६ हजार ८४६ रुपये एवढी रक्कम जमा केलेली आहे.

महारेराने आतापर्यंत ६२४.४६ कोटी रूपयांच्या नुकसान भरपाईच्या वसुलीसाठी ११०७ वारंटस जारी केलेले आहेत. यापैकी आतापर्यंत १२४ वारंटसची ११३.१७ कोटीची रक्कम वसूल करण्यात महारेराला यश आलेले आहे. उर्वरित रक्कमही वसूल व्हावी यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील आहे.

Mumbai News
Eknath Shinde : मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपली? मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, आता लवकरच...

ज्यांनी रकमा जमा केल्यात किंवा ग्राहकांशी तडजोडी केल्या त्यात मुंबई उपनगरातील विधी रिअल्टर्स, स्कायस्टार बिडकाॅन, लोहितका प्रॉपर्टीज, व्हिजन डेव्हलपर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज अशा ५ विकासकांचा यात समावेश असून त्यांनी अनुक्रमे ४ कोटी १ लाख ९७ हजार, ५७ लाख ८४ हजार,

१७ लाख ४० हजार, ३७ लाख , २५ लाख ६६ हजार १३७ अशी एकूण ५ कोटी ३९ लाख ८७ हजार १३७ एवढ्या रकमेचे दावे निकाली काढलेले आहेत. रक्कम जमा केलेली आहे.

यातील व्हिजन डेव्हलपर्स प्रकरणी मा. उच्च न्यायालयात समेट झालेला आहे. तर विधी रिअल्टर्स आणि विजयकमल प्रॉपर्टीज यांनी ग्राहकांशी तडजोड करून, तडजोडीच्या प्रतींची उप निबंधकांच्या कार्यालयात रितसर नोंदणी करून घेतलेली आहे.

मुंबई शहरातील मातोश्री प्रॉपर्टीज, श्री सदगुरू डिलक्स आणि फलक डेव्हलपर्सनीही ३ नोटीस अनुक्रमे २२ लाख ५० हजार, १५ लाख ७५ हजार आणि ९ लाख ७० हजार ५५० असे एकूण ४७ लाख ९५ हजार ५५० जमा करण्यात आलेले आहेत. अलिबाग भागातील( जिल्हा रायगड) विनय अग्रवाल या विकासकाकडे 13 वारंटसपोटी नुकसान भरपाईची १ कोटीच्यावर देणी आहेत. त्यापैकी त्यांनी न्यायाधिकरणाकडे ( Tribunal) ७८ लाख ८५ हजार ४३१ रुपये एवढी रक्कम जमा केलेली आहे. यातून १० नोटिशींची पूर्तता होणार आहे.

ठाणे येथील रवी डेव्हलपर्स आणि नताशा डेव्हलपर्स या दोन विकासकांनी तडजोड करून प्रत्येकी एका नोटीशीपोटी अनुक्रमे १ कोटी १९ लाख ५८ हजार ७२८ आणि ७१ लाख रूपये जमा केलेले आहेत. असे एकूण ११ विकासकांनी २० वारंटसपोटी ८ कोटी ५७ लाख २६ हजार ८४६ रूपये जमा केलेले आहेत. काहींनी याबाबतचे दावे निकाली काढलेले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com