Eknath Shinde : मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा संपली? मुख्यमंत्री शिंदेंचं मोठं विधान; म्हणाले, आता लवकरच...

CM Eknath Shinde with Devendra Fadnavis
CM Eknath Shinde with Devendra Fadnavis esakal

मुंबईः राज्यात शिंदे-फडणवीसांचं सरकार येऊन ११ महिने झाले तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सत्तापक्षातील अनेक आमदारांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली तरीही विस्तार रखडलेलाच आहे. आज मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठं विधान केलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, राज्य सरकार ७५ हजार नोकऱ्या देणार आहे. त्या अनुषंगाने पावलं उचलली जात आहे. सरकार शब्द पाळणार आहे.

CM Eknath Shinde with Devendra Fadnavis
Prithviraj Chavan : राष्ट्रवादी क्रमांक एकचा असेल तर ठाकरेंचा तीन नंबरचा पक्ष; पृथ्वीराज चव्हाणांचा घाव

याशिवाय कौशल्य विकासाच्या माध्यमातन दोन लाख लोकांना नोकऱ्या देण्यात येणार आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांचा विभाग अनेक कंपन्यांशी समन्वय साधत असून तरुणांना रोजगार आणि स्वयंरोजगार देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या माध्यमातून दोन लाख लोकांना नोकऱ्या मिळणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.

CM Eknath Shinde with Devendra Fadnavis
Vardha : निधी रद्द करण्याच्या पत्रामुळे नागरिकांत असंतोष; भाजप आमदाराच्या निषेधाचे झळकले बॅनर

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलतांना एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल.

दरम्यान, मागच्या ११ महिन्यांपासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर विस्तार होईल, असं बोललं जात होतं. मात्र अद्यापही सरकारला मुहूर्त सापडलेला नाही. आज मात्र मुख्यमंत्र्यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं विधान केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com