esakal | अँटिलीया स्फोटके प्रकरण : प्रचंड चर्चेतील 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' सचिन वाझे कोण आहेत ?

बोलून बातमी शोधा

अँटिलीया स्फोटके प्रकरण : प्रचंड चर्चेतील 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' सचिन वाझे कोण आहेत ?}

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सचिन वाझे यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट अशीही ओळख होती.

अँटिलीया स्फोटके प्रकरण : प्रचंड चर्चेतील 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' सचिन वाझे कोण आहेत ?
sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेली जी स्कॉर्पियो गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्यानंतर आज विधानसभेत महाराष्ट्राचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुद्दा लावून धरला. विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता ही केस NIA कडे सोपवली जावी अशी मागणी लावून धरली. दरम्यान या सगळ्या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार क्राईम ब्रांचचे सचिन वाझे यांच्या नावाचा उल्लेख केला. मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केट मध्ये कुणाला भेटले हे जाणून घेण्यात यावं, मनसुख हिरेन यांचे सचिन वाझे यांच्याशी आधीपासून संबंध होते, तसे CDR रिपोर्ट असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं, दरम्यान मनसुख हिरेन यांचा मृतदेह ज्या ठिकाणी सापडला तिथेही सचिन वाझेच सर्वात आधी कसे पोहोचलेत असे विविध सवाल फडणवीसांनी उपस्थित केले. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सचिन वाझे यांचं नाव घेतलं ते सचिन वाझे नक्की आहेत कोण जाऊन घेऊयात.     

महत्त्वाची बातमी : अँटिलीया स्फोटके प्रकरण : स्कॉर्पियो कार मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू, मृतदेह आढळला खाडीत

कोण आहेत सचिन वाझे ? 

सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. सचिन वाझे यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट अशीही ओळख होती. सचिन वाझे आतापर्यंत  60 हून अधिक एन्काऊंटर केले आहेत अशीही माहिती आहे. सचिन वाझे यांनी बनावट नोटांशी संबंधित मोठी प्रकरणे देखील हाताळली आहेत तसेच सचिन वाझे यांनी सायबर क्राईम संबंधित अनेक प्रकरणे हाताळली आहेत.

मुंबईतील घाटकोपरमध्ये झालेल्या बस बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी ख्वाजा युनूसचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या प्रकरणात काही पोलिस अधिकाऱ्यांवर पुरावे नष्ट करणे आणि हत्येच्या आरोपांतून निलंबन करण्यात आलेलं त्यापैकी सचिन वाझे एक होते. त्यानंतर सचिन वाझे यांनी पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर 16 वर्षांनंतर 2020 मध्ये सचिन वाझे हे पोलिस दलात परतले आहेत. 

सचिन वाझे यांनी विविध विषयांवर पुस्तके देखील लिहिली आहेत. 2008 च्या दसरा मेळाव्यात सचिन वाझे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. 

नुकत्याच समोर आलेल्या फेक अन्वय नाईक प्रकरणात अर्णब गोस्वामी यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यामध्ये देखील सचिन वाझे यांची प्रमुख भूमिका राहिली आहे.

mumbai news mukesh ambani case mansukh hiren found dead who is sachin vaze