Mumbai-Madgaon Special Trains | कोकणात जाण्यासाठी मुंबई-मडगाव विशेष ट्रेन

कुलदीप घायवट
Sunday, 24 January 2021

कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्यावतीने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई-मडगाव विशेष ट्रेनची भेट दिली आहे.

मुंबई  : कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्यावतीने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई-मडगाव विशेष ट्रेनची भेट दिली आहे. 1 एप्रिल ते 9 जूनपर्यंत दररोज मुंबई-मडगाव सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे. 
गाडी क्रमांक 01111 एक एप्रिल ते 9 जूनपर्यंत सीएसएमटीहून  दररोज रात्री 11.05 वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसर्‍या दिवशी सकाळी 10.45 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01112 एक एप्रिल ते 8 जून पर्यंत मडगाव येथून दररोज सायंकाळी 6 वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसर्‍या दिवशी पहाटे 5.50 वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01113 2 एप्रिल ते 9 जूनपर्यंत  सीएसएमटी येथून दररोज सकाळी 7.10 वाजता सुटेल आणि  मडगाव येथे त्याच दिवशी सायंकाळी 7  वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 01114 एक एप्रिल ते 9 जूनपर्यंत मडगाव येथून दररोज सकाळी 9.15 वाजता सुटेल आणि  सीएसएमटी येथे त्याच दिवशी रात्री 9.40  वाजता पोहोचेल.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

 गाडी क्रमांक 01111/01112 व 01113/01114  विशेष ट्रेनचे  वाढीव सेवांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग 24 जानेवारी रोजी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. केवळ कन्फर्म  तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास परवानगी देण्यात आली आहे.  प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि इच्छितस्थळी पोहचण्याच्या वेळी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे

Mumbai news mumbai Madgaon special train to Konkan railway

------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai news mumbai Madgaon special train to Konkan railway