BMC Pipeline Repair Project
ESakal
मुंबई
Mumbai Water Supply: जलवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी ५.१७ कोटींचा प्रकल्प, वर्षभरात काम पूर्ण होणार!
BMC Project: जलगळती दुरुस्तीसाठी महापालिकेने मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. यासाठी ५ कोटी १७ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे.
मुंबई : पूर्व उपनगर विभागातील जलगळतीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून महापालिकेने मोठी पावले उचलली आहेत. या भागातील ३०० मिमी आणि त्यावरील आकारमानाच्या जलवाहिन्यांच्या गळती दुरुस्तीसाठी पाच कोटी १७ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. हे काम सुमती सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे सोपविण्यात आले असून, १२ महिन्यांच्या कालावधीत काम पूर्ण होणार आहे.

