कोरेगाव भीमा दंगलीमागे नक्षलवादी संघटनांचा हात

अनिश पाटील
Thursday, 18 January 2018

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरण व त्यानंतर परिस्थिती भडकवण्यासाठी चार महिन्यांपूर्वीपासून राज्यभर नक्षलवादी विचारसरणीच्या संघटनांनी सभा घेतल्याचे गुप्तचर विभागाच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबईत त्यासाठी सुमारे 23 छोट्या मोठ्या सभा झाल्या होत्या.

मुंबई - कोरेगाव भीमा प्रकरण व त्यानंतर परिस्थिती भडकवण्यासाठी चार महिन्यांपूर्वीपासून राज्यभर नक्षलवादी विचारसरणीच्या संघटनांनी सभा घेतल्याचे गुप्तचर विभागाच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. मुंबईत त्यासाठी सुमारे 23 छोट्या मोठ्या सभा झाल्या होत्या.

वढू बुद्रुक येथे घडवण्यात आलेला प्रकार, त्यानंतर कोरेगाव भीमा प्रकरण व त्याला देण्यात आलेला जातीय रंग यासाठी चार महिन्यांपूर्वीपासूनच राज्यभर सभा घेण्यात आल्या होत्या. या बैठकांमध्ये 200 वर्षांपूर्वीच्या इतिहासाबद्दलची माहिती वारंवार तरुणांच्या मनात बिंबवण्यात आली. मुंबईत अशा सुमारे 15 मोठ्या बैठका, परिषदा झाल्या. तसेच सात-आठ छोट्या बैठकाही झाल्या होत्या. माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने हा सर्व प्रकार कसा वाढवण्यात येईल, याचेही नियोजन करण्यात आले होते. या प्रकरणानंतर पोलिसांनी सोशल मीडियावरील अनेक पोस्ट ब्लॉक केल्या आहेत; पण त्यानंतरही असे प्रकार सुरूच आहेत. सध्या जातिवाचक भावना भडकवल्या जातील, असे संदेश, चित्रफितीही वितरित केल्या जात आहेत. अशाच एका चित्रफितीबाबत मुंबईत पोलिसांकडे दोन तक्रार अर्जही आले आहेत. अद्याप त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली.

कोरेगाव भीमा प्रकरणामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे पडसाद राज्यभर उमटले. राज्यभर तोडफोड व पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांमुळे सुमारे 90 पोलिस जखमी झाले आहेत. मुंबईतील चेंबूर, पवई, गोवंडी या ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली. मोठ्या प्रमाणात सरकारी मालमत्तेचे नुकसान झाले. प्रतीक्षानगर, वरळी नाका, पवई, सांताक्रूझच्या मोतिलालनगर आणि इतर ठिकाणी बसची तोडफोड करण्यात आली आहे. राज्यभरात दंगलखोरांनी केलेल्या उपद्रवाच्या डझनभर चित्रफिती व ध्वनीफिती पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
दरम्यान, दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) कथित स्वरूपात नक्षलवादी असलेल्या सात जणांना मुंबई व कल्याणमधून अटक करून त्यांच्याशी संबंधित व्यक्तींना इशारा दिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news naxalite organisation involve in koregaon bhima riot