esakal | ब्रेक लाईट नाही, नंबर प्लेट नाही... आणि अशाच गाड्या वापरतायत खुद्द वाहतूक पोलिस;  यांना काय बोलायचं सांगा

बोलून बातमी शोधा

ब्रेक लाईट नाही, नंबर प्लेट नाही... आणि अशाच गाड्या वापरतायत खुद्द वाहतूक पोलिस;  यांना काय बोलायचं सांगा}

या टोईंग व्हॅनचे ब्रेक लाईट चक्क बंद होते. तर नंबर प्लेट सुद्धा गायब होते

ब्रेक लाईट नाही, नंबर प्लेट नाही... आणि अशाच गाड्या वापरतायत खुद्द वाहतूक पोलिस;  यांना काय बोलायचं सांगा
sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई, ता.17 : सर्वसामान्य नागरिकांना वाहतूक नियमांचे धडे देणारे आणि त्यांच्यावर कारवाई करणाऱ्या वाहतुक पोलिसांकडूनच सर्रास मोटार वाहन कायद्याच्या नियमांची पायमल्ली केली जात आहे. चक्क परिवहन आयुक्तांचे कार्यालय असलेल्या एमजी रोड फाऊंटन मार्गावर हा प्रकार उघड झाला आहे. 

एमजी रोड फाऊंटन मार्गाच्या कडेलाच स्कुल व्हॅन चालक-मालकांनी गैरप्रकारची अनधिकृत पार्किंग लेन तयार केली आहे. लॉकडाऊन काळापासूनच या एमजी रोड परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांच्या कडेला स्कुल व्हॅन उभ्या केल्या जातात. मात्र, या स्कुल व्हॅनवर अद्याप कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून हे मार्ग स्कुल व्हॅनचे पार्किंग ठिकाण झाले आहे. मात्र, सोमवारी त्याच मार्गावर रस्त्यांच्या कडेला उभ्या असलेल्या एका खासगी वाहनावर वाहतुक पोलिसांकडूनच कारवाई करण्यात आली. त्यातही धक्कादायक बाब म्हणजे, कारवाई करणाऱ्या वाहनाला अटकाव करणारे टोईंग व्हॅन बेकायदा असल्याचे दिसून आले. 

महत्त्वाची बातमी : वीज ग्राहकांच्या मागण्या मान्य न केल्यास 'भाजप'चे जेलभरो आंदोलन; 'या' आहेत भाजपच्या 7 मागण्या

या टोईंग व्हॅनचे ब्रेक लाईट चक्क बंद होते. तर नंबर प्लेट सुद्धा गायब होती. यासंदर्भात संबंधीत वाहतूक पोलिसांना विचारणा केल्यास पोलिसांनी मात्र त्यावर उत्तर देण्यास नकार दिला. त्यामूळे मुंबईत वाहतुक पोलिसांकडून वापरण्यात येणाऱ्या टोईंग व्हॅनच बेकायदा वापरल्या जात असल्यास सामान्य नागरिकांवर कारवाई करण्याचा अधिकार यांना कोणी दिला, असा प्रश्‍न सामान्यांकडून विचारला जात आहे. 

या घटनेची माहिती मिळताच टोईंग व्हॅनवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये नंबर प्लेट आणि ब्रेक लाईट नसल्याचा एकूण दंड 1200 रूपये करण्यात आला आहे. तर तात्काळ दुरूस्ती करण्याच्या सुचना सुद्धा देण्यात आल्या आहे असं आझाद मैदान पोलिस निरीक्षक विजय भिसे म्हणालेत. 

mumbai news no break light no number plate traffic police toing vans are illegal