मुंबई - पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या कारभार चौकशीच्या कचाट्यात सापडला आहे. वेगवेगळ्या चौकशी यंत्रणाचा कारवाईचा धडाका सुरू आहे. गेल्या दोन दिवसात पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर घरी छापे टाकून चौकशी सुरू केलीआहे. या कारवाईनंतर पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्था निर्माण झाली आहे.
मुंबईत ईडीने छापे टाकले. या छापेमारीमुळे अधिकारी कर्मचा-याची धाबे दणाणले आहे. पालिका आयुक्तांची इकबाल सिंग चहल यांची सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ने तब्बल चार तास चौकशी केली. या प्रकरणातील कागदपत्रे ‘ईडी’कडे सुपूर्द केली पालिका आयुक्तांनी सुपूर्त केली. पालिकेच्या कामात १२ हजार कोटींच्या कामांत गैरव्यवहाराचा झाल्याचा आरोप आहे. मुंबई पालिकेच्या ७६ कामांची चौकशी होणार असल्याचे समजते.
कॅगने पालिकेच्या कोरोना काळातील अनियमितेचीवर ठपका ठेवला आहे. ही चौकशी लोकलेखा समितीपुढे पंधरा ते सोळा वेळा होणार आहे. अद्याप चौकशी झालेली नसल्याचे समजते. पालिकेच्या अधिका-यांवर छापे पडत असल्याने ते कमालीचे धास्तावले आहेत. पालिका निवडणुक जवळ आल्यामुळे ही कारवाई सुरू आहे.
या कारवाईमुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात सुरू आहे. 1 जुलै रोजी महापालिकेवर विरोट मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिला आहे. त्याआधी हा चौकशी यंत्रणाचा धडाका लावल्याचे बोलले जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.