कोरोना नियमांचा बट्ट्याबोळ ; मध्यरात्री उशीरापर्यंत मुंबईतील उपहार गृहे, बार हाउसफुल्ल  

प्रशांत कांबळे
Friday, 19 February 2021

राज्य सरकारने मिशीन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉक करण्याचा निर्णय घेत दुकाने आणि उपहार गृहांच्या वेळा ठरवून दिल्या होत्या

मुंबई, ता.19:  मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल चहल यांनी 6 फेब्रुवारी परिपत्रक काढून महानगरपालिका हद्दीतील हॉटेल, रेस्टॉरंट, रेस्टारंट आणि बार, बॅंक्वेन्ट हॉल आणि फुड कोर्ट सकाळी 7 चे रात्री 1 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर उपहार गृहे आणि बार हाऊसफुल्ल दिसून येत असून, कोविड 19 च्या नियमांचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे  सध्या मुंबईतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या गर्दीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारने मिशीन बिगिन अगेन अंतर्गत अनलॉक करण्याचा निर्णय घेत दुकाने आणि उपहार गृहांच्या वेळा ठरवून दिल्या होत्या. त्याअंतर्गत मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी हॉटेल, रेस्टॉरंट, बार सकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी दिली होती. तर दुकाने सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत, तसेच मद्यविक्री करणाऱ्या आस्थापना सकाळी 10 ते रात्री 10.30 वेळेत खुली ठेवण्याची परवानदी देण्यात आली होती. 

महत्त्वाची बातमी : थायमोसिन अल्फा 1, कोविड 19 रुग्णांसाठी फायदेशीर ठरणारी नवीन उपचार पद्धती

या सर्व आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि इतर उपाययोजनांचे पालन करणे बंधनकारक होते. मात्र उपहार गृह आणि बार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने तळीरामांकडून या नियमावलींना हरताळ फासला जात आहे. सोशल डिस्टन्सिंग, तसेच कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामूळे आधीच मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची आकडेवारी वाढत असल्याने, उशिरापर्यंत चालणारे उपहार गृहे आणि बार मूळे अधिक रुग्णवाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

काय होत आहे 

1. एका टेबलवर किमान लोक बसण्याच्या नियमांना हरताळ
2. बहुतांश कर्मचाऱ्यांच्या तोंडावरुन मास्क बेपत्ता 
3. ग्राहक सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत नाही 
4. सॅनिटायझर बॉटल टेबलवर, प्रवेशाद्वारावरुन गायब
5. बहुतांश बारमध्ये प्रवेशद्वारावर तापमान मोजण्यास विसर 
6. मद्यपान करुन बाहेर पडल्यानंतर बार बाहेर गर्दी

महत्त्वाची बातमी : फेसबुकवरील मैत्रिणीने गंडवून करवून घेतले नसते चाळे; नंतर सुरु झाले खंडणीसाठी फोन 

रेस्टारंट आणि बार 5 ऑक्‍टोंबरपासून सुरू आहेत. राज्य सरकारने दिलेल्या कोविड-19 सर्व नियमांचे रेस्टारंट आणि बार मध्ये पालन केलं जात आहे. ग्राहकांसह रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांचीही सुरक्षेची आमच्यावर जबाबदारी आहे असं आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी म्हणालेत.

mumbai news people are not following covid rules bars and reataurants are open till 1 midnight


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news people are not following covid rules bars and restaurants are open till 1 midnight