थायमोसिन अल्फा 1, कोविड 19 रुग्णांसाठी फायदेशीर ठरणारी नवीन उपचार पद्धती

थायमोसिन अल्फा 1, कोविड 19 रुग्णांसाठी फायदेशीर ठरणारी नवीन उपचार पद्धती

मुंबई, १९ : अतिदक्षता विभाग अर्थात क्रिटिकल केअर तज्ज्ञांनी थायमोसिन अल्फा 1 ही नवीन थेरपी कोरोनाच्या उपचारांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-19 रुग्णांवर उपचार आणि त्यांना मदत करणारी ही थेरपी असणार आहे. या थेरपीच्या मदतीने रुग्णांना पुन्हा चांगले जीवन आणि शेवटी मृत्यूदरात सुधारणा होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

जगात आज तीव्र श्वसन विकार रोग असा सिंड्रोम कोरोनाव्हायरस (सार्स कोविड-2) साथीची गंभीर स्थिती आहे. यावर कोणतेही सिद्ध विशिष्ट उपचार उपलब्ध नाहीत. कोविड-19 बाधित रूग्णांच्या बचावासाठी आलेली एक नवीन थेरपी म्हणजे थायमोसिन अल्फा 1 (Thymosin Alpha 1) . इम्युनोसिन अल्फा 1 अशा नावाच्या औषध रेणुमुळे रोग प्रतिकारक शक्तीच्या यंत्रणेत बदल घडवता येतात. यामुळे संपूर्ण भारतात अनेक रुग्णांना मदत झाली आहे. भारतातील क्रिटिकल केअर तज्ज्ञ, मध्यम ते गंभीर कोविड-19 रूग्णांमध्ये या रेणूच्या वापराची जोरदार शिफारस करत आहेत.

कोविड-19 रूग्णांमध्ये लक्षणांच्या गंभीरतेवर उपचार करणारे डॉक्टर म्युनोसिन अल्फा 1 चे डोस ठरवतात. याचा उपचार कालावधी 7 दिवसांचा आहे. कोणत्याही प्रतिकूल परिणामाशिवाय औषध चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे. यात असे आढळून आले आहे की, को-मॉर्बिड परिस्थिती असलेल्या रुग्णांना कोविड-19 संसर्गाची अति संवेदनशीलता असते. ही रुग्णसंख्या जगभरात उच्च मृत्यु दर असलेल्या संख्येपैकी एक आहे. इम्यूनोसीन अल्फा 1 ने मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा आजार आणि वृद्ध रुग्णांसारख्या कॉमोरबिड अटी असलेल्या कोविड-19 रूग्णांच्या उपचारांमध्ये फायदा दर्शवला आहे.

थायमोसिन अल्फा 1 हे कोविड-19 च्या उपचारात सुरक्षित आणि प्रभावी औषध असल्याचे संशोधन अभ्यासानुसार सिद्ध झाले आहे. थायमोसिन अल्फा 1 इम्युनोमोड्युलेटर आहे जो आपल्या शरीरातील टी पेशी सक्रिय करतो जो विषाणू नष्ट करण्यास मदत करतो आणि प्रतिकारशक्ती उत्तम प्रकारे सुधारतो.

थायमोसिन अल्फा ही नवीन उपचार पद्धती आहे. यात जशी शुद्ध हवा श्वास घेण्यास येते तेव्हा एआरडीएसने फुफ्फुसांना दुखापत होते. यातून झालेल्या संसर्गामुळे शरीराच्या इतर भागाला दुखापत होऊन त्याला धक्का बसलेला असतो. मात्र यामुळे कोरोनाचा धोका कमी केला जातो” असे मत जसलोक रुग्णालयाचे संसर्गजन्य रोग सल्लागार डॉ. ओम श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. या

इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे उपाध्यक्ष डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले की, थायमोसिन अल्फा 1 या रेणुचा 55 हून अधिक रूग्णांवर वापर केला गेला आहे. थायमोसिन अल्फा 1 थायमिक पेप्टाइड संप्रेरक असल्यामुळे, थायमस ग्रंथीला हे महत्त्वपूर्ण आणि जास्त महत्वाचे टी पेशी तयार होण्यास मदत होते. थायमोसिन अल्फा एक सहायक औषध आहे, तर हे थेरपीचा मुख्य प्रकार नाही. हे कोविड रूग्णांमध्ये कार्य करते की नाही हे पाहण्याचा आम्ही प्रयत्न केला, त्यापैकी अनेक उपचारांपैकी हा एक उपचार आहे. निश्चितच, थेरपीचा नकारात्मक परिणाम झालेला नाही. त्यामुळे रुग्णाची चांगली काळजी, हायपोक्सिक असलेल्या रूग्णांसाठी ऑक्सिजन, हायपोक्सिक रूग्णांसाठी कमी डोस स्टिरॉइड्स, अँटीकोएगुलेशनसाठी डीव्हीटी प्रोफाइल आणि वेंटिलेशनची गरज आहे.

इम्युनोसिन अल्फा 1 एक अद्भुत रेणू आहे. आम्ही हा रेणू सौम्य ते मध्यम प्रकरणात वापरला आहे. या रुग्णांमध्ये, रेणू चांगले कार्य करत आहे. याच्या वापरामुळे मृत्यूदर आणि ऑक्सिजनच्या वापरात ही घट दिसून आली आहे, असे के जे सोमैया सुपरस्पेशलिटी सेंटर सल्लागार अ‍ॅनेस्थेसियोलॉजिस्ट चिन्मय गोडबोले यांनी सांगितले. 

mumbai news thymosin alpha 1 new therapy for novel corona virus covid 19 patients

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com