esakal | 58 बँक खाती, 171 फेसबुक पेजेस, 5 टेलिग्राम चॅनेल्स आणि 54 मोबाईल्स; सेक्सटॉर्शनच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश
sakal

बोलून बातमी शोधा

58 बँक खाती, 171 फेसबुक पेजेस, 5 टेलिग्राम चॅनेल्स आणि 54 मोबाईल्स; सेक्सटॉर्शनच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश

ब्लॅकमेलिंगचे व्हिडिओ कसे बनवायचे यासाठी आरोपींनी प्रशिक्षण घेतले होेते.

58 बँक खाती, 171 फेसबुक पेजेस, 5 टेलिग्राम चॅनेल्स आणि 54 मोबाईल्स; सेक्सटॉर्शनच्या काळ्या बाजाराचा पर्दाफाश

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : व्हॅट्सअ‍ॅप , फेसबुक अशा सोशल मिडियाच्या माध्यमातून तरुणींच्या बनावट नावाने  मैत्री करून आक्षेपार्य व्हिडिओ व फोटो चित्रीत करून ब्लॅकमेल करणाऱ्या बड्या टोळीचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. यातील तिघा आरोपींना हरयाणा आणि राजस्थान येथून अटक करण्यात आली. 

सध्याच्या युगात सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. याचा फायदा अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घेत असल्याच्या तक्रारी देखील वाढल्या आहेत. सायबर गुन्हेगारीच्या आकड्यांवरून हे सिद्ध होतंय. यातील आरोपी फेसबुक, व्हॅट्सअ‍ॅप, गुगल तसेच टेलिग्रामसर्कझ्या मोबाईल ऍप्लिकेशनचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. 

महत्त्वाची बातमी : मन सुन्न करणारी घटना ! 11 हजार वोल्ट विद्युत प्रवाह असलेल्या वाहिनीला चिकटली लोखंडी शिडी, शिडीसोबत खेळात होता लहानगा

पूजा शर्मा, नेहा शर्मा अशा प्रकारे परिचीत नावांच्या तरुणींच्या नावाने तरुणींचा फोटो वापरून हे भामटे अकाऊंट उघडत असत. त्यानंतर यातील आरोपी प्रतिष्ठित व्यक्तींना आपलेसावज बनवून त्यांच्याशी मैत्री करीत असत. त्यांना व्हिडिओ कॉल करून त्यांना मोहात पाडून त्यांना दुष्कृत्य करण्यास भाग पाडतात आणि त्याचे व्हिडिओ काढून त्यात बदल करून ते सोशल मिडियावर त्यांच्या नातेवाईंकडे पाठवण्याची धमकीदेतात. धमकीसोबत खंडणीसाठी देखील मागणी केली जाते. 

अशा गुन्ह्यांच्या वाढत्या तक्रारींवरून सायबर पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले व तांत्रिक तपास करून यातील म्होरक्यासह तीन आरोपींना राजस्थान, हरयाणा येथून अटक केली. यातील अटक करण्यात आलेल्या आरोपींनी अशा प्रकारे प्रतिष्ठितांना ब्लॅकमेल करण्यासाठी 54 मोबाईल्सचा वापर केल्याचे उघड झाले. तसेच अपहार केलेली रक्कम वळती करण्यासाठी पेटीएम फोन पे सारख्या वॉलेट्सची एकूण 58 बँक खाती वापरून 171 फेसबुक पेजेस,  5 टेलिग्राम चॅनेल्स तयार केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

महत्त्वाची बातमी :  MMRDA च्या प्रकल्पांमुळे मुंबईचा कायापालट होणार; प्रवाशांचा वेळ आणि पैसा बचतीचा मेगाप्लॅन

ब्लॅकमेलिंगचे व्हिडिओ कसे बनवायचे यासाठी आरोपींनी प्रशिक्षण घेतले होेते. ते त्यांचे सावज हेरण्यासाठी गुगल सर्च इंजिनचा वापर करीत असल्याचे उघड झाले आहे. हे सेक्सटॉर्शनचे रॅकेट पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, हरयाणा, राजस्थान या राज्यांच्या काही भागांत सुरू असल्याचे उघड झाले असून पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. 

mumbai news police captured high tech racket who we duping people vie various social media apps