पूजा चव्हाण मृत्यूबाबत मोठी अपडेट : मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल

सुनीता महामुणकर
Tuesday, 2 March 2021

टिकटॉक स्टार असल्यामुळे पूजा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिच्या आत्महत्येचा तपास पोलिस व्यवस्थित करीत नाही, असा आरोप याचिकेत केला आहे. 

मुंबई, ता. 2 : टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूबाबत आता मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल झाली असून वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

राठोड यांनी नुकताच याप्रकरणी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ऍडव्होकेट आर एन कछुवे यांच्यामार्फत  मुंबई उच्च न्यायालयात याचिका  दाखल केली आहे. वानवडी पोलिस याप्रकरणी योग्य प्रकारे तपास करीत नाही, अनेक महत्त्वाचे मुद्दे पोलिस विचारात घेत नाही, असा आरोपही याचिकेत केला आहे.

महत्त्वाची बातमी : येत्या काही दिवसात तापमान किती वाढणारे, वाचा

याचिकेवर लवकरच न्या. एस एस शिंदे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. मूळची बीडची असलेली पूजा चव्हाण इंग्लिश स्पिकिंगच्या अभ्यासासाठी पुण्यात हेवन पार्क सोसायटीत भावाकडे आली होती. 8 फेब्रुवारी रोजी तीने घरातील बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर एक दोन दिवस तपासामध्ये गेले. पोलिसांना काही ध्वनीफिती आणि मेसेज तपासात सापडले. त्यावरून काही आवाज आणि महत्त्वाचे धागे दोरे मिळाले. यामध्ये राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यामुळे सध्या  यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

मोठी बातमी : फेब्रुवारी महिन्यात कोरोनाचा 'स्पाईक', कोरोनाचे नियम पाळणे अत्यंत आवश्यक

टिकटॉक स्टार असल्यामुळे पूजा सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. तिच्या आत्महत्येचा तपास पोलिस व्यवस्थित करीत नाही, असा आरोप याचिकेत केला आहे. 

mumbai news puja chavan death case criminal petition filed in mumbai high court


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news puja chavan death case criminal petition filed in mumbai high court