Mumbai News : रायगड, ठाण्याला हक्काचे क्रीडा संकुल ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत उभारणीला मंजुरी

त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश पवार यांनी दिले.
raigad
raigadsakal

महाड/माणगाव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत माणगाव विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीला मंजुरी देण्यात आली. यामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंकरिता हक्काचे क्रीडा संकुल उपलब्ध होणार आहे. रायगड परिसराचा वेगाने होत असलेला विकास आणि खेळाडूंची गरज लक्षात घेऊन माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे. त्याच्या उभारणीचे काम दर्जेदार आणि जलदगतीने पूर्ण करण्यात यावे, असे निर्देश पवार यांनी दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २६) मंत्रालयात माणगाव येथील विभागीय क्रीडा संकुलाच्या उभारणीसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे, खासदार सुनील तटकरे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव नितीन करीर,

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (नवी १) असीम कुमार गुप्ता, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (नवी २) के. गोविंदराज, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव आशिष शर्मा, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे उपस्थित होते.

raigad
Raigad : मुरूड किनाऱ्याच्या सुशोभीकरणाला गती

४० ते ५० एकर जागा आवश्यक

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे जिल्ह्यांसाठी माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. या चार जिल्ह्यातील युवा खेळाडूंना आणि क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे ठिकाण उपयुक्त ठरेल.

या विभागीय क्रीडा संकुलासाठी ४० ते ५० एकर जागा आवश्यक असून ती रागगड जिल्हा प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत दिल्या. नियोजित असलेल्या क्रीडा संकुलापर्यंत जाणारा मार्गही प्रशस्त असला पाहिजे. यामध्ये कोणतीही तडजोड करू नये. त्यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी या वेळी दिले.

raigad
PKL 2021 : U MUMBA नं 30 सेकंदात पलटलेला सामना अखेर बरोबरीत

आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांचे पालन करा!

माणगाव येथील नियोजित विभागीय क्रीडा संकुलासाठी निश्चित करण्यात आलेली जागा ही महामार्गालगत असल्याने कोकणातील रायगड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या चारही जिल्ह्यातील तसेच राज्याच्या अन्य जिल्ह्यातून येणाऱ्या खेळाडूंसाठी हे ठिकाण सोयीचे आहे. या क्रीडा संकुलात

raigad
Thane: ठाण्यातील नामंकित हॉटेल्सची तपासणी | Inspection of hotels

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या विभागीय क्रीडा संकुलाचा आराखडा तयार करताना आंतरराष्ट्रीय क्रीडा निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या विभागीय क्रीडा संकुलाच्या कामाला गती देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. नवी मुंबईतील स्पोर्टस् कॉम्प्लेक्सच्या उभारणीचे प्रलंबित कामही तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश त्यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com