आता ग्रह ताऱ्यांच्या दुनियेचा अनुभव होणार अविस्मरणीय, नेहरू तारांगणमध्ये होणार बदल

आता ग्रह ताऱ्यांच्या दुनियेचा अनुभव होणार अविस्मरणीय, नेहरू तारांगणमध्ये होणार बदल

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या 2020-21 अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पात नेहरू तारांगण- नेहरू सेंटर, मुंबई या संस्थेस अत्याधुनिक यंत्रांची खरेदी, आधुनिकीकरण व नूतनीकरणासाठी 10 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे नेहरू तारांगणमधील जुन्या झालेल्या सामग्रीऐवजी अत्याधुनिक यंत्राची खरेदी केली जाणार आहे.

डिस्कव्हरी ऑफ इंडिया प्रदर्शनाचे नुतनीकरण करून पुन्हा इतिहास जिवंत केला जाणार आहे.
वरळी येथील नेहरू तारांगण आबालवृद्धांचे आकर्षणाचे केंद्र आहे. तारांगणातील गोलाकार थिएटरमधल्या प्रदर्शनात खुर्च्यामध्ये झोपून आकाशदर्शन घेता येते. या तारांगणांत आकाशातील तारे आणि ग्रह बघता येतात. ग्रह ताऱ्यांची ओळख व इतर अवकाशातील माहिती आणि त्या व्यतिरिक्त अंतराळ संशोधनाचे विविध टप्पेही या प्रदर्शनात मांडलेले असतात.

विविध ताऱ्यांच्या, ग्रहांच्या नावाने इथे वजन काटे लावण्यात आले आहेत. यावर उभे राहून वजन केल्यास त्या ताऱ्यांवरील तुमचे वस्तुमान किती हे समजते. त्याचबरोबर या केंद्रातील डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे कायमस्वरूपी प्रदर्शन आहे. यात आदिमानव काळापासून ते भारतीय स्वातंत्र्य पूर्व कालखंडाचा इतिहास सांगितला जातो. या तारांगणाला आणखीन सुबक बनविण्यासाठी नवीन झळाळी देण्यासाठी 10 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 

महत्त्वाची बातमी : खासदार मोहन डेलकर प्रकरण : आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

मनोरंजन क्षेत्रात खूप नवनवीन तंत्रज्ञान अंमलात आणली जाऊ लागली. डिजिटल तंत्रज्ञान सुरू झाले. त्यामुळे नेहरू तारांगण अद्ययावत करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणण्यात येणार आहे.  पूर्वीच्या पद्धतीत तारे, ग्रह हे काही प्रमाणात अंधुक दिसून येतात. मात्र लेझर पद्धतीचे प्रोजेक्टर घेण्यात येणार आहे. ही खर्चिक बाब असल्याने राज्य सरकारकडे प्रस्ताव मांडण्यात आले. हा मान्य करण्यात आल्याने त्यासाठी राज्य सरकारकडून 10 कोटींची तरतुदींची मंजुरी मिळाली. लेझर पद्धतीच्या प्रोजेक्टर वास्तव्यवादी रंग उत्तम प्रकाशमयी चित्र दिसून येईल. रंगछटा उत्तम दिसून येतील. त्यामुळे प्रेक्षकांनावेगळा अनुभव नेहरू तारांगणांत मिळणार आहे. 

डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे 24 वर्षांपूर्वीपासून तयार केलेले प्रदर्शन प्लायवूडमध्ये तयार करण्यात आले आहे. इतक्या वर्षांपासून हे प्रदर्शन उभे आहे. त्यामुळे काही ठिकाणी प्लायवूड खराब झाला आहे. त्यासाठी या प्रदर्शनाला नवीन रूप देण्यासाठी 10 कोटींपैकी 5 कोटी रुपये नवीन धाटणीतील प्रदर्शनासाठी वापरले जाणार आहे.

लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर नेहरू तारांगण बंद करण्यात आले होते. त्यामुळे सर्वसामग्री बंद करण्यात आली आहे. मात्र सामग्री खराब होऊ नये, यासाठी दर आठवड्याला त्याची देखभाल केली जात आहे. सध्या सर्वांसाठी नेहरू तारांगण बंद आहे. मात्र सरकारने नेहरू तारांगण सुरू करण्याचे निर्देश दिल्यास चार दिवसात तारांगण सूरु करण्यात येईल. यासह प्रेक्षकांना आधीसारखे मनोरंजन, अभ्यास करता येणार आहे. 

नेहरू तारांगणांत वर्षाला सुमारे 3 लाख 60 हजार प्रेक्षक भेटी देतात. यात सर्वाधिक संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमातील भाग नेहरू तारांगणात शिकून जातात. नेहरू तारांगणाला भेट देण्यासाठी 100 रुपये तिकीट आकारले जाते. यातून वार्षिक महसूल सुमारे 1 कोटी 50 लाखांचा होतो. यामध्ये विद्यार्थ्यांना 50 टक्के कमी तिकीट दर आकारला जातो. तर, महापालिकेच्या शाळेमधील, दिव्यांग, गरजू, सुरक्षा व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांसाठी तिकीट दर आकारला जात नाही. 

नेहरू तारांगणच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियाच्या नूतनीकरण करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधीचा वापर केला जाणार आहे. तर, नेहरू तारांगण अद्ययावत करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधीचा वापर केला जाणार आहे. अनेक जुन्या यंत्राला नवीन झळाळी देण्याचे काम केले जाणार आहे. सध्या तारांगण सर्वांसाठी बंद आहे. राज्य सरकारच्या निर्देशानंतर तारांगण सर्वांसाठी खुले केले जाईल असं नेहरू तारांगणचे  अध्यक्ष अरविंद परांजपे म्हणालेत.

mumbai news renovation of neharu tarangan will provide better experience to all science and space lovers

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com